प्रश्न३. टिपा लिहा. (१) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे (२) हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण
Answers
Answer:
1.मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे
उत्तर-1.विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते.
2.उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते.
3.जड झालेली हि हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25°ते 35°अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते.
4.परिणामी,उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25°ते 35°अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात.
5.हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात.
6.मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते .परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.
2.हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण
उत्तर-1.पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितीजसमातंर दिशेत वायुदाब सारखा नसतो.
2.वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो.
3.हवेच्या दाबाच्या अश्या वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितीजसमातंर वितरण म्हणतात.