English, asked by kharwaderoshan1, 3 months ago

प्रश्न १) वाक्याचे प्रकार ओडाखा १) झासी चे रानी लक्ष्मी बाई शुर होत्या​

Answers

Answered by ansarishazia13
0

Answer:

मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते।

1-अर्थावरून पडणारे प्रकारस्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात 2-असणार्‍या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार

Explanation:

अर्थावरून पडणारे प्रकार :

  • विधांनार्थी वाक्य –ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात।उदा .

मी आंबा खातो।

गोपाल खूप काम करतो।

  • प्रश्नार्थी वाक्य –ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.उदा.

तू आंबा खल्लास का?

तू कोणते पुस्तक वाचतोस?

  • उद्गारार्थी वाक्य –ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.उदा.

अबब ! केवढा मोठा हा साप

कोण ही गर्दी !

  • होकारार्थी वाक्य –ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .उदा .

माला अभ्यास करायला आवडते.

रमेश जेवण करत आहे.

  • नकारार्थी वाक्य –ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.उदा.

मी क्रिकेट खेळत नाही.

मला कंटाळा आवडत नाही.

  • स्वार्थी वाक्य –ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.उदा.

मी चहा पितो.

मी चहा पिला.

  • आज्ञार्थी वाक्य –ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.उदा.

तो दरवाजा बंद कर (आज्ञा)

  • विधार्थी वाक्य –जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.उदा.

आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)

तू पास होशील असे वाटते (शक्यता)

  • संकेतार्थी वाक्य –जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.उदा.

जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

स्वरूपावरुण पडणारे प्रकार :

  • केवळ वाक्य –ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.उदा.

राम आंबा खातो.संदीप क्रिकेट खेळतो.

  • संयुक्त वाक्य –जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.उदा.

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.

  • मिश्र वाक्य –जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.उदा.

नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.

17 जून 1858 ला राणी लक्ष्मीबाईंनी किंग्स रॉयल आयरिश विरोधात युद्ध पुकारले आणि पूर्व क्षेत्रातील ग्वालियर चे नेतृत्व केले. या युद्धात त्यांच्या महिला सेविकांनी देखील त्यांना चांगली साथ दिली.गेल्या युद्धात राणीचा घोडा ‘राजरतन‘ मारला गेल्याने या युद्धावेळी त्यांचा घोडा नवीन होता. या युद्धा दरम्यान राणी लक्ष्मीबाईंना हे आपले अखेरचे युद्ध असल्याची जाणीव झाली होती.प्राप्त परिस्थिती स्वीकारत त्या पराक्रमाने युद्ध करीत राहिल्या. या युद्धात राणी जबर जखमी झाली आणि घोड्यावरून खाली कोसळली.

Answered by omkargalfade299
1

Answer:झासी चे रानी लक्ष्मी बाई शुर होत्या​

Explanation:

Similar questions