Math, asked by SomaanJ6114, 1 year ago

प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व क्रूतीत आणतानाचा तुमचा अनुभव

Answers

Answered by anshuthetharbasna
3

Answer:गौडबंगाल  

‘या प्रकरणात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे’, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला कळत असते की, या प्रकरणात काहीतरी रहस्य आहे, पण ते नक्की काय हे माहिती नाही. मग हा शब्द आला कुठून?  गौड+बंगाल म्हणजे तरी काय? कारण ‘गौड’ हे बंगालचेच नाव आहे. मग अशी पुनरावृत्ती करणे म्हणजे, ‘मुलींची कन्याशाळा’ म्हणण्यासारखेच होईल ना. तर हे असे नाही. या ‘गौड’चा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे गूढ जाणणारा. त्यासोबतच मंत्रतंत्र, जादूटोणा, कूट रचना, चमत्कार, अद्भुत घटना असे अनेक अर्थ त्याला आहेत. मग त्याला बंगालशी का जोडले गेले आहे? तर बंगालमधील लोक जादू या कलेसाठी प्रसिद्घ होते. (जादूटोण्यासाठी असे म्हटलेले नाही.)विश्वविख्यात जादूगार सरकार हे बंगालीच आहेत. तर जादू ही काहीतरी भारावून टाकणारी, रहस्यमय कला आहे. खरेतर हे एक कलाकौशल्य आहे. तोच अर्थ या गौडबंगालला थोडय़ा नकारात्मक अर्थाने येऊन चिकटला म्हणूनच जे जे गूढ, रहस्यमय ते गौडबंगाल झाले.

झक मारणे

अकबर-बिरबलाच्या गोष्टी ज्यांनी लहानपणी वाचल्या असतील, त्यांना झक मारणे, या शब्दाचा अर्थ माहिती असू शकतो. एका गोष्टीत बिरबल अकबराला सांगतो, महाराज मी झक मारत बसलो होतो.

ती गोष्ट आता इथे सांगत नाही. ते पुढे येईलच पण ‘झक मारणे’ हा वाक्प्रचार आपण अनेक अर्थानी वापरतो.

उदा. ‘झक मारली आणि तिथे गेलो’ म्हणजे उगाचच गेलो. ‘अस्सं काही करेन ना मी की त्याला झक मारत यावे लागेल’ म्हणजे त्या माणसाचा नाइलाज होईल, त्याला ते करावेच लागेल अशा अर्थाचे काहीतरी. ‘काय झक मारत बसलाय, जरा, काम कर’ म्हणजे उगाच वेळ घालवत बसला आहेस. एकूणच या वाक्प्रचाराचा अर्थ उगाचच काहीतरी करत बसणे, वेळ वाया घालवणे, निरुपयोगी काही करत बसणे, महत्त्वाचे टाकून क्षुल्लक कामात अडकणे, असा काही होतो. पण मग अशा अर्थपूर्तीसाठी ‘झक’ हाच शब्द का तयार झाला असावा? तर ‘झक’ म्हणजे मासा. अशा या झक माशाला पकडण्यासाठी तासन्तास ताटकळत बसण्यावरून झक मारणे हा वाक्प्रचार तयार झाला. अत्यंत क्षुद्र कामासाठी वेळ दवडणे, निष्क्रिय बसणे यासाठी हा शब्द वापरल्या जाऊ  लागला. याच संदर्भात एक पुष्टी जोडता येईल. ‘झकवाद’देखील आहे. झकवाद म्हणजे शुष्कवाद, वितंडवाद घालणे, मिथ्या बोलणे, निरुपयोगी, अहितकारी, बिनकामाचे, फसवेगिरीचे भाषण करणे.

Similar questions