India Languages, asked by sonavanesumanbhumi12, 7 months ago

प्रतिक्षण samasik shabdacha vigrah karun samas olkha

Answers

Answered by riyaprbh
17

Answer:

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.

उदा.  

विधाधन – विधा हेच धन

यशोधन – यश हेच धन

तपोबल – ताप हेच बल

काव्यांमृत – काव्य हेच अमृत

ज्ञांनामृत – ज्ञान हेच अमृत

6. व्दिगू समास

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद  कर्मधारय समास असेही म्हणतात.

उदा.  

नवरात्र – नऊ रात्रींचा समूह

पंचवटी – पाच वडांचासमूह

चातुर्मास – चार मासांचा समूह

त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह

त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह

सप्ताह – सात दिवसांचा समूह

चौघडी – चार घडयांचा समुह

7. मध्यमपदलोपी समास

ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्‍यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारेय समास असेही म्हणतात.

उदा.  

साखरभात – साखर घालून केलेला भात

पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी

कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे

घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार

बालमित्र – बालपणापासूनचा मित्र

चुलत सासरा – नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा

लंगोटी मित्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र

3) व्दंव्द समास :

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

उदा.  

रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण

विटीदांडू – विटी आणि दांडू

पापपुण्य – पाप आणि पुण्य

बहीणभाऊ  – बहीण आणि भाऊ

आईवडील – आई आणि वडील

स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष

कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन

ने-आण  – ने आणि आण

दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर

व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.

1. इतरेतर व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.

उदा.  

आईबाप – आई आणि बाप

हरिहर – हरि आणि हर

स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष

कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन

पशुपक्षी – पशू आणि पक्षी

बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ

डोंगरदर्यात – डोंगर आणि दर्यात

2. वैकल्पिक व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.

उदा.    

खरेखोटे – खरे आणि खोटे

तीनचार – तीन किंवा चार

बरेवाईट – बरे किंवा वाईट

पासनापास –  पास आणि नापास

मागेपुढे – मागे अथवा पुढे

चुकभूल – चूक अथवा भूल

न्यायान्याय – न्याय अथवा अन्याय

पापपुण्य – पाप किंवा पुण्य

सत्यासत्य – सत्य किंवा असत्य

3. समाहार व्दंव्द समास

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.

उदा.  

मिठभाकर –  मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी

चहापाणी –  चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ

भाजीपाला – भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु

अंथरूणपांघरून – अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्‍या वस्तु व इतर कपडे

शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता

केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ

पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ

नदीनाले – नदी, नाले, ओढे व इतर

जीवजंतू – जीव, जंतू व इतर किटक

 4) बहुव्रीही समास :

ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.  

नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)

वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)

दशमुख  – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)

बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

1. विभक्ती बहुव्रीही समास

ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.

प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती

जितेंद्रिय – जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती

जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती

गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती

पूर्णजल – पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती

त्रिकोण – तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती

2. नत्र बहुव्रीही समास

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदा.  

अनंत – नाही अंत ज्याला तो

निर्धन – नाही धन ज्याकडे तो

नीरस – नाही रस ज्यात तो

अनिकेत – नाही निकेत ज्याला तो

अव्यय – नाही व्यय ज्याला तो

निरोगी – नाही रोग ज्याला तो

अनाथ – ज्याला नाथ नाही असा तो

अनियमित – नियमित नाही असे ते

अकर्मक – नाही कर्म ज्याला ते

अखंड – नाही खंड ज्या ते

3. सहबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

उदा.  

सहपरिवार – परिवारासहित असा जो

सबल – बलासहित आहे असा जो

सवर्ण – वर्णासहित असा तो

सफल – फलाने सहित असे तो

सानंद – आनंदाने सहित अ

Explanation:

i know quite big but this is what i learnt

Answered by mamtapatil496
18

Answer:

प्रतिक्षण = प्रत्येक क्षणी , क्षणोक्षणी

Similar questions