प्रत्येक घरात दररोज थोडा तरी कचरा किंवा टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. जर तुम्ही हा कचरा अनेक दिवस तुमच्या घरातच राहू दिलात तर काय होईल?
Answers
Answer:
प्रत्येक घरात दैनंदिन जीवनात काहींना काही कचरा तयार होत असतो, जसे कि भाजी बनवताना तिची निघालेली टाकाऊ देठे, बटाट्याच्या, इतर भाज्यांच्या आणि फळांच्या साली, कापडाच्या पिशव्या आणि चिंध्या, प्लास्टिक च्या पिशव्या, अलुमिनिम, जस्ताचे डबे, थर्मोकॉल कप.
यामध्ये काही सुका कचरा असतो तर काही ओला.
सुका कचरा जर घरात साठवून ठेवला आणि त्याचे व्यवस्थापन व्यवस्थित केले गेले नाही तर त्याचा ढीग घरात साचून राहील, घर अस्वच्छ तर दिसेलच आणि काही दिवसांनी माणसाला घरात राहायला जागा राहणार नाही. सगळीकडे कचराच कचरा असेल.
ओला कचरा जर घरात खूप दिवस साठवून ठेवला तर त्याचे तिथेच विघटन व्हायला सुरवात होईन आणि त्याला दुर्गंधी सुटेल जेणेकरून तिथे राहणे मुश्किल होईल.
त्यावर माश्या आणि इतर कीटक घोंगावातील आणि ते रोगाचा प्रसार करतील.
घरात अत्यंत घाणेरडे वातावरण तयार होईल त्यामुळे दैनंदिन जीवनात तयार होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.