प्रदूषणाचे परिसरावर झालेले 7 परिणाम सांगा
Answers
Answer:
हवेत श्वसन केल्याने, माणसाच्या मेंदूतील जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो, असे तिथल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगात, तिथल्या संशोधकांनी मेंदूतील हिप्पोकॅम्पस या स्मरणशक्ती, शिकणे, भावावस्था यांच्याशी निगडित असलेल्या भागाचा सखोल अभ्यास करून सदर निष्कर्ष काढला.
माणसाच्या वाढत्या चंगळवादामुळे हवेचे प्रदूषण होत आहे आणि आपण स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत. कॅनडातील एका अर्थतज्ज्ञांच्या तुकडीने हवेतील प्रदूषण आणि लोकांचा आनंद यातील संबंध स्पष्ट करणारा दीर्घ आढावा घेतला आहे. त्यांनी ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ग्रीन इकॉनॉमिक्स’ या जागतिक नियतकालिकात आपला शोधनिबंध प्रकाशित करून वातावरणातले हवेचे प्रदूषण आणि नागरिकांची आनंदी वृत्ती यासंबंधी सविस्तर उहापोह केला आहे. हवेचे प्रदूषण वाढल्याने माणसे लवकर दु:खी होतात. इतकेच नाही तर ज्या देशातले नागरिक आनंदी नसतात, तिथे हे प्रदूषण अवाजवी आढळून आले आहे.
हा प्रकल्प हाती घेताना त्यांनी १४ युरोपियन देशांची निवड केली होती. त्यांना या दोन घटकांमधला संबंध प्रस्थापित करायचा होता. त्यांनी बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आर्यलड, इटली, लुक्सेम्बर्ग, नेदरलँड, पोर्तुगील, रोमानिया, रशिया, स्पेन आणि इंग्लंड या देशातील हवाई प्रदूषणाची माहिती (डेटा) गोळा केली. त्या देशांतील इंधन ज्वलनातून होणारे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोजले आणि ‘ग्रॅन्गर कॅज्युएलिटी’ चाचणी वापरून नागरिकांच्या सौख्याचे मोजमाप केले. ही चाचणी क्लाईव्ह ग्रॅन्गर या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ञाने शोधून काढली असून ती संख्याशास्त्रातील एक गृहितक आहे. दोन घटकांतील परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी ही चाचणी वापरली जाते. या शोधातून प्रदूषणाची कुठली पातळी, मानवी उदासिनतेसाठी कारणीभूत ठरते, हे समजले नसले तरी शासनाने प्रदूषण रोखण्यासाठी राबविलेले धोरण नागरिकांच्या संतोषाला कारणीभूत ठरते हे स्पष्ट होते. स्वच्छ हवा माणसाला सुखकारक ठरते आणि त्यामुळे शासनांनी आपल्या विविध धोरणांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. चांगले शिक्षण धोरण राबविले, गरिबी उच्चाटनाची कास धरली आणि कामाच्या ठिकाणचा ताण कमी केला तर नागरिक समाधानाने जगताना आढळतात.