Hindi, asked by shobhabansode222, 2 months ago

प्रदूषण एक अभियान निंबध मराठी​

Answers

Answered by samarthjagtap96
0

Hi I don't know who are you and which std why I am giving your question answer

Answered by viqarmehdi9
0

Explanation:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत. आज जगातील सर्वात गंभीर समस्‍या असेल तर ती वाढते प्रदूषण आहे . आज भारत असो की इतर कोणताही देश त्‍या देशातील हवा, पाणी, माती,ध्‍वनी यांचे प्रदूषण दिवसेदिवस वाढतच आहे. या 3 निबंधात प्रदूषणाची कारणे व उपाय यावर सविस्‍तर माहीती दिलेली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मानवाच्या प्रगतीचा वारू आज बेलगाम चौखूर उधळला आहे, ज्याची वेसण आज अडकली आहे- भ्रष्टाचाराच्या भस्मासुरामध्ये, लोकसंख्येच्या लकव्यामध्ये आणि प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात, जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने ग्रहण लावतात, त्यालाच ‘प्रदूषण' असे म्हणतात.

आज प्रदूषण कोठे नाही? हवा, पाणी, अन्न, जमीन, तापमान, आवाज या साऱ्यांनाच या प्रदूषणाने ग्रहण लावलंय! औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला. परंतु निसर्गाच्या कुंपणाने माणसाच्या जीवनाला धडका मारणारा हा उन्मत्त बैल थोपवून धरला होता. वातावरणात मिसळणारे वाहनांचे धूर व Lead Poisoning सारखं माणसानंच निर्माण केलेलं प्रदुषणाचं रूप, आज जग गिळंकृत करू पाहणाऱ्या वामनात कधी रूपांतरित झालं हे भौतिक सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या मनुष्यप्राण्याला कधी कळलंच नाही.

परंतु चेर्नेबिल अणुभट्टीच्या स्फोटासारखं प्रदूषण निसर्ग कसा थांबवणार? अशा स्फोटांमुळे तापमानात बदल होऊन त्यामुळे ऋतुचक्राची चाकेच खिळखिळी होऊ लागली आहेत. भोपाळच्या वायु दुर्घटनेची भीषणता आज कुणी विसरू शकेल? डॉ. दत्ता सामंतांच्या शरीरालाच संप पुकारावा लागला, तो मुंबईमध्ये झालेल्या क्लोरीन गळतीमुळे ! -Touch of Midas' गोष्टीतल्या मिडास राजासारखीच आज मानवाची अवस्था होऊ लागली आहे!

Soclean Society च्या अहवालानुसारं ३ हजार टन इतका गोबरगॅस एकट्या मुंबईमध्ये दर दिवशी गोळा होतो. सतराशे टन इतकी प्रदूषिते रोज हवेत सोडली जातात अन् २० लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. प्रदूषण दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा २४ तास वापरणेही आज माणसाला शक्य नाही.

लाऊडस्पीकरवर वाजवली जाणारी कर्णकर्कश्श गाणी, सिनेमागीते, डिस्को, वाढलेली रहदारी, वाहनांचे कर्णकटू आवाज या साऱ्यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण केले आहे. २० ते ७० डेसिबल इतका आवाज ऐकू शकण्याची व सहन करण्याची क्षमता असणाऱ्या माणसाच्या कानांनी धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे.

१०० च्या पेक्षा जास्त डेसिबलचा आवाज ऐकून विघ्नहर्त्याने गणेशोत्सवात कुणाकडे दाद मागावी? याहीपेक्षा भयानक आहे ते म्हणजे 'मानसिक प्रदूषण' वाढती गुन्हेगारी, बालिका-हत्या, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, युवा पिढीची उदासीनता, जुन्या पिढीची निष्क्रियता, व्यसनाधीनता, अति सुखासीनता यामुळे मानवी मनच कलुषित झालं आहे, प्रदूषित झालं आहे. ही समस्या हा प्रत्येक राष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. ही एक राष्ट्रीय समस्या आहे. मग यावर उपाय तो कोणता? 'स्वच्छ पर्यावरण', चांगल्या विचारांचं मन हे कुठल्याही उदबत्तीच्या सुवासापेक्षाही सुवासिक आहे.

१९७४ मधील Water Act व १९८१ मधील 'Clean air act' ची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. कलम २७७, २७८, ८४ च्या नुसार गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसा प्रत्येक दिवस पर्यावरण दिन म्हणून मानला पाहिजे, पाळला पाहिजे. जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते व औषधी फवारे यांच्या अमर्याद वापरावर बंधन आणले पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे घराघरातून निर्माण झाले पाहिजेत.

वाया गेलेल्यांतून नवीन गोष्टींचा जन्म झाला मळीपासून स्पिरीट, शेणापासून गोबरगॅस, पेट्रोलियमपासून घरगुती गॅस निर्माण झाला तर ताजमहाल पुन्हा धवल बनेल, गंगा ' मैली' राहणार नाही! मनाची नि तनाची शुचिता व शुद्धता नष्ट करू पाहणाऱ्या या प्रदूषणरूपी प्रलयांतून मनुष्याच्या आशा-आकाक्षाचा मनू तरून जाणे सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती कल्पकतेची, नियोजनाच्या होडीची!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

Similar questions