प्रदूषण एक गंभीर समस्या मराठी मध्ये
Answers
Explanation:
प्रदूषण हे मानवी जीवनसाठी घातक आहे .आपण सर्वांनी प्रदूषण रोखण्यासाठी काही गोष्टी टाळायला पाहिजेत.नाहीतर त्याचे दुसपरिणाम आपल्याला जाणवतील.
प्रदूषण वाढते प्रदुषण* म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.
प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -"
पाणी प्रदूषण:अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते.
हवाप्रदूषण:हवाप्रदूषण
ध्वनिप्रदूषण: वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते.
सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.
हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.
मृदा प्रदूषण - यामुळे मातीत असलेली सुपीकता कमी होते आणि त्यात विषारी पदार्थ मिसळले जातात.
Answer:
प्रदूषण हे एवढे मोठे संकट आहे की, सारे विश्व आता याबाबत खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे दरवर्षी वसुंधरा दिन' पाळून ' वसुंधरा बचाव' हा संदेश सर्वांना दिला जातो. वसुंधरेमुळे आपण या जगात सुखासमाधानाने राहू शकतो, याचाच विसर या वसुंधरापुत्रांना पडला आहे आणि ते आपल्या प्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढवत आहेत. प्रदूषण हे मानवनिर्मित आहे; पण या मानवाला त्याची जाणीवच नाही. माणूस आपल्या बुद्धीने नव्या नव्या गोष्टी सुरू करतो, पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण होत आहे का, याचा विचार तो करत नाही. उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्याने जंगलतोड केली. त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. जमिनीची धूप वाढली.
माणसाने आपल्या अचाट बुद्धिमत्तेने अनेक कारखाने सुरू केले, अनेक प्रकारची वाहने शोधून काढली. त्यामुळे वायुप्रदूषण वाढले. माणसाला अत्यंत आवश्यक असते ती शुद्ध हवा. दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात. माणसे, पशू, पक्षी मृत्युमुखी पडतात. कित्येक दुर्मिळ वनस्पती नष्ट होतात. गिरण्या-कारखान्यांतील दूषित पाणी नदयांमध्ये सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते. अशा दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे रोगग्रस्त होत आहेत. माणसाला आपले सर्वस्व वाहणाऱ्या नदीला दूषित करताना माणसाला मात्र थोडीही खंत वाटत नाही. माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्ग हाती आल्यासारखे वाटले. अनेक गोष्टींसाठी त्याने प्लास्टिक आवरणांचा उपयोग सुरू केला; पण त्यामुळे घनकचरा वाढू लागला. प्लास्टिक कुजत नसल्यामुळे हा कचरा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. शेतातील पिकांवर कीड पडू नये, म्हणून औषधे फवारली जातात. अशा या औषधांमुळे वातावरण प्रदूषित होतेच; पण अशा अन्नधान्यांचा माणसाच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो. हिवा व पाणी यांच्या होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणेच आणखी एक प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनिप्रदूषण. आपल्याभोवती सतत मोठमोठे कर्कश आवाज होत असतात. कर्कश आवाजात लावलेले कर्णे आसमंताची शांतता नष्ट करतात. त्यामुळे मनाची शांतताही नष्ट पावते. अशा वातावरणात लोक कार्यक्षमतेने कामे करू शकत नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. त्यांची आयुर्मर्यादा घटते. या सर्व प्रकारच्या प्रदूषणांमुळे माणसाचे आरोग्य बिघडत आहे. एवढेच नव्हे, तर त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. माणसाला जिवंत राहायचे असेल, तर प्रदूषण नाहीसे करावेच लागेल.