India Languages, asked by Anonymous, 4 months ago

प्रदूषण या विषयावर निबंध लिहा.​

Answers

Answered by rudramkanase
2

Explanation:

प्रदूषण एक समस्या हा विषय मुलांना शाळेमध्ये निबंध, भाषण, परिचछेद लेखन, वादविवाद स्पर्धा इत्यादींसाठी सांगितला जातो. ह्या लेखामध्ये आम्ही प्रदूषण ह्या विषयावर निबंध, भाषण दिले आहे. ह्या लेखामध्ये आम्ही प्रदूषण एक समस्या, प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार व उदाहरणे कोणती? तसेच प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला प्रदूषण या विषयावर निबंध, भाषण लिहण्यास उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध भाषण लेख

प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळतात.. पृथ्वीजवळ, सुमारे ५० किमी उंचीवर एक उतारमंडल आहे, ज्यामध्ये ओझोनची पातळी आहे. या पातळीमुळे सूर्यप्रकाश अल्ट्राव्हायलेट (यूवी) किरणांपासून मुक्त होऊन पृथ्वीपर्यंत पोचतो. आज ओझोनची पातळी वेगाने विघटित झाली आहे, ओझोनचा थर वायुमंडलीय क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) गॅसमुळे विघटित होत आहे.

१९८० मध्येओझोन पातळीचे विघटन सर्व पृथ्वीवर होत असल्याचे प्रथम लक्षात आले. दक्षिण ध्रुव विस्तारांमध्ये ओझोन पातळीवरील व्यत्यय 40% -50% आहे. या प्रचंड घटनेला ओझोन होल (ओझोन होल) म्हणतात. ओझोनच्या पातळी कमी झाल्यामुळे ध्रुवीय प्रदेशांवरील बर्फ वितळण्यास सुरवात झाली आहे आणि मनुष्याला अनेक प्रकारच्या त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

प्रदूषणाचे प्रकार

पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी

जेव्‍हां काही विषारी पदार्थ नद्या, समुद्र, तलाव, आणि इतर जलाशयांमध्‍ये प्रवेश करतात तेव्‍हां ते पाण्‍यामध्‍ये विरघळून जातात अथवा तळाशी जाऊन सडतात, कुजतात किंवा पाण्‍यावरच अवक्षेपित होतात. आणि यामुळे पाणी अशुद्ध होते आणि जलप्रदूषण होते त्यामुळे जलपर्यावरण प्रणालींवर दुष्‍परिणाम होतो. प्रदूषक पदार्थ तळाशी जाऊन, जमिनीखाली जाऊन बसू शकतात आणि ह्यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्‍परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषण फक्‍त मानवांसाठीच नव्‍हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्‍यांसाठीही विनाशकारी आहे. प्रदूषित पाणी हे पिण्‍यासाठी, त्यात खेळण्‍यासाठी, शेती आणि उद्योगासाठी देखील अयोग्‍य आहे. ह्याच्‍यामुळे सरोवरे आणि नद्यांच्‍या सौंदर्यात्‍मक गुणवत्ता नष्ट होते. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध, भाषण

वायू प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा

वायू प्रदूषण म्‍हणजे वातावरणात घातक दूषित पदार्थ मिश्रित होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. वायू प्रदूषणामुळे हवामानात देखील बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. आज ज्या ज्या ठिकाणी कारखाने आहेत तेथील रहिवासी असलेल्या लोकांना दीर्घ आजाराला सामोरे जावे लागत आहे. आपणच आपल्या हाताने प्रदूषणाची समस्या वाढवून ठेवली आहे. वायु प्रदूषण कारणे, परिणाम, उपाय निबंध माहिती

ध्वनिप्रदूषण म्हणजे मोठा आवाज

नको असलेला, खूप जोराचा आवाज म्‍हणजेच ध्‍वनि प्रदूषण. ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन ४५ डेसिबल असल्‍याचे निश्चित केलेले आहे आणि ९० डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो.

ध्‍वनिप्रदूषणामुळे फक्‍त चिडचिडपणा किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. आणि ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी देखील वाढते, ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त आवाजामुळे तंत्रिका रोग (न्‍यूरोसिस) आणि नर्व्‍हस ब्रेक डाउन (तंत्रिका अवरोध) देखील होण्याची शक्यता असते, असे तज्ञांचे मत आहे.

Similar questions