Political Science, asked by kishoreambulkar38, 10 months ago

• प्रथमोपचार म्हणजे काय ?​

Answers

Answered by mrunali312
18

प्रथमोपचार (First aid)

एखाद्या व्यक्तीला एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा जखम झाल्यास जे उपचार तातडीने आणि काळजीपूर्वक केले जातात, त्यांना प्रथमोपचार म्हणतात. ज्या व्यक्तीवर असे उपचार केले जातात तिचा जीव वाचविणे, स्थिती वार्इट होण्यापासून रोखणे व पूर्ववत करणे यासाठी प्रथमोपचार आवश्यक असतात. जखमी व्यक्तीला किंवा जिचे स्वास्थ बिघडले आहे अशा व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार करणे गरजेचे असते.

Answered by pgadade496
0

Answer:

एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे 'प्रथमोपचार'.

प्रथमोपचार म्हणजे रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार

पायऱ्या

प्रथोमोपचार सुरू करताना प्रथम रूग्णाला धीर द्यावा. श्वासोच्छ्वास असेल तर

प्रथमोपचार करतांना तुम्हाला धोका तर नाही ना हे प्रथम तपासा

आवश्यक असल्यास रुग्णवाहिका बोलावण्याची व्यवस्था करा

श्वासोच्छ्वास तपासा, सुरू असेल तर.

रुग्णास एका कडेवर झोपवा.

उताणे झोपवू नका बेशुद्ध रुग्णाची जीभ हळू हळू आत सरकून त्याचे श्वासमार्ग बंद होऊ शकतात.

इतर आवश्यक उपचार देण्याची सुरुवात करा.

श्वासोच्छ्वास बंद असेल तर

श्वासोच्छ्वास बंद असेल तर त्वरित उताणे करा. रुग्णाच्या तोंडात काही नाही हे पहा.

तोंडाने श्वासोच्छ्वास द्या

दोन्ही हातांनी छातीवर दोन्ही हातानी जोरदार दाब द्यायला सुरुवात करा एका - मिनिटात किमान ३० वेळा

परत तोंडाने २ श्वासोच्छ्वास द्या

हा क्रम वैद्यकीय मदत मिळे पर्यंत सुरू ठेवा.

लक्षात ठेवा कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर कितीही काळ जिवंत ठेवता येते. कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरू राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते.

Similar questions