(३) प्रथमोपचारांनी रक्तस्राव न थांबल्यास काय करावे
Answers
Answer:
0 Comments
एखाद्या व्यक्तीला एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा जखम झाल्यास जे उपचार तातडीने आणि काळजीपूर्वक केले जातात, त्यांना प्रथमोपचार म्हणतात. ज्या व्यक्तीवर असे उपचार केले जातात तिचा जीव वाचविणे, स्थिती वार्इट होण्यापासून रोखणे व पूर्ववत करणे यासाठी प्रथमोपचार आवश्यक असतात. जखमी व्यक्तीला किंवा जिचे स्वास्थ बिघडले आहे अशा व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार करणे गरजेचे असते.
प्रथमोपचार करताना प्रथमोपचारांची प्राथमिक माहिती असणे गरजेचे असते. ज्या व्यक्तीवर प्रथमोपचार करावयाचे आहे तिचे अस्वास्थ्य वाढू न देणे, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तिला धीर देणे आणि उपचार चालू करणे, प्रकृतीत गुंतागुंत होऊ न देणे ही प्रथमोपचाराची उद्दिष्टे असतात. प्रथमोपचार करीत असताना श्वसनमार्ग मोकळा ठेवणे, कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे, गरज पडल्यास हृदय स्पंदन करणे, रक्तस्राव थांबविणे आदी बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.