प्रयोगातील विज्ञान शिक्षण निबंध
Answers
Answer:
मराठी विज्ञान परिषद आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नववे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन दि. 16 ते 18 नोव्हेंबरदरम्यान होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मानखुर्द येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा. भगवान चक्रदेव आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा.
Answer:
प्रचलित विज्ञानशिक्षणात विज्ञानाच्या अनेकविध शाखोपशाखा, विषयोपविषय यांच्याबरोबरच तंत्रविद्येच्या अभ्यासाचाही अंतर्भाव होतो. विज्ञान हा अवतीभवतीचे स्थूल/जड जग व निसर्ग जाणून घेण्याच्या मानवाचा पद्धतशीर आणि प्राचीन काळापासून चालत आलेला प्रयत्न आहे. त्यासाठी मानवाने निसर्गाचे, निसर्गातील घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण केले व निसर्गातून आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू कशा मिळवाव्यात, याची साधने शोधली. या ज्ञानाचा उपयोग अनेक उपयुक्त कार्यासाठी त्याने केला, त्यामुळे मानवी जिज्ञासेचे क्षेत्रही व्यापक झाले, तसेच मानवाचे ज्ञान समृद्ध होत गेले आणि आपल्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी तंत्रविद्या त्याला विकसित करता आली. निसर्ग जाणून घेण्याच्या व निसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याच्या प्रक्रियेचा विज्ञानात मुख्यत्वे अंतर्भाव होतो. मानवाचे जीवन सुखी व सुरक्षित करण्याचे एक साधन, ही विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी सुरूवातीपासूनच विकसित होत गेली आहे. यात महत्त्वाची बाब अशी, की प्रगतीचा वेग सतत वाढत आहे. शंभर वर्षापूर्वीच काय, दहा-पंधरा वर्षापूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज साध्य झाल्या आहेत.
आधुनिक जगात विज्ञान व तंत्रविद्येला विशेष स्थान व महत्त्व असून, मानवी जीवनव्यवहाराची जवळजवळ सर्वच क्षेत्रे त्यांनी व्यापली आहेत. शेती व अन्नधान्य, आरोग्य, पोषण व वैद्यकव्यवसाय, उद्योगधंदे व औद्योगिक विकास, निवास व सार्वजनिक वास्तु-बांधकाम, नैसर्गिक साधनसंपत्ती, वाहतूक, माहिती व जनसंज्ञापन, शिक्षण, मनोरंजन आदी सर्व क्षेत्रांत मानवी जीवनाचे कल्याण साधण्याची प्रभावी साधने म्हणून विज्ञान व तंत्रविद्या यांस असाधारण महत्त्व आहे. त्यासाठी वैज्ञानिक ज्ञान तसेच त्याचा उपयोजित तंत्र म्हणून केलेला व्यावहारिक वापर यांवर अधारित अशी कार्यपद्धती व फलिते वापरली जातात. वैज्ञानिक ज्ञान फार झपाट्याने विस्तारत गेले आहे. अज्ञाताचा चिकित्सक पद्धतीने सतत शोध घेण्याच्या मानवी वृत्तीतून विज्ञानाचा हा आजवरचा विकास-विस्तार घडून आला आहे. त्यामुळे सतत विकास पावत असलेल्या विज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे, ही आजच्या मानवाची व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने नित्याची गरज ठरली आहे.
Mark me Brainliest!!
: )