पैसे पाठविण्याच्या विविध पद्धती स्पष्ट करा
Answers
Answer:
अधिकोषांमध्ये विविध प्रकारच्या खालील सुविधा ग्राहकांना दिल्या जातात
१) बचत खाते
२) चालू खाते
३) रोख पत खाते
४) विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना
५) विविध प्रकारच्या कर्ज योजना
६) सुरक्षा जमा कक्ष
७) बॅंक हमी
८) पत पत्र व्यवहार
९) हुंडी व्यवहार
१०) विमा विक्री
११) परदेशात पैसे पाठवणे
१२) कर संकलन
१३) देय रकमांची वसुली (इंग्लिश : Bill Collection)
१४ ) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरण सुविधा
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत बँक ही महत्त्वाची संस्था असते. आधुनिक काळातील गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार हे मोठ्या प्रमामावर बँकांवर अवलंबून असतात. एखाद-दुसऱ्या दिवसासाठी जरी बँकांचे व्यवहार बंद राहिले, तरी देशाची आर्थिक व्यवस्था खीळ घातल्यासारखी होते.
बँकेची निश्चित आणि सर्वमान्य व्याख्या देणे कठीण आहे कारण बँकेची कार्ये आणि व्यवहार यांमध्ये कालानुरूप बदल होत गेले आहेत. त्याचप्रमाणे निरनिराळ्या देशांतील बँकांच्या कार्यांत आणि व्यवहारांत फरक आढळून येतो. असे असले, तरी बँकेची स्थूलमानाने कल्पना येण्यासाठी पुढील व्याख्या उपयुक्त ठरतात. या तीन व्याख्यांपैकी पहिल्या दोन व्याख्या बँकिंगमध्ये तज्ञ म्हणून गणल्या जाणाऱ्या लेखकांच्या असून तिसरी भारतातील ‘बँकिंग रेग्युलेशन अँक्ट’, १९४९ (बँकिंग विनियमन अधिनियम) या कायद्यात दिलेली आहे.
प्रा. एल्. हार्ट : बँकर म्हणजे अशी व्यक्ती की, जी आपल्या व्यवसायाच्या नेहमीच्या व्यवहारांमध्ये, लोकांकडून चालू खात्यावर पैसे (ठेवी) स्वीकारते आणि त्यांनी (ठेवीदारांनी) त्याच्यावर काढलेल्या धनादेशाचा आदर करते (म्हणजे चेकचे पैसे देते).
सर जॉन पॅजेट : ठेवी घेणे, चालू खात्यावर पैसे स्वीकारणे, धनादेश काढणे व स्वतःवर काढलेल्या धनादेशांचे पैसे देणे आणि स्वतःच्या ग्राहकांकरिता रेखित किंवा अरेखित धनादेशांचे पैसे वसूल करणे यांपैकी कार्ये न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला बँकर म्हणता येणार नाही.
बँकिंग रेग्यु लेशन ॲक्ट, १९४९ : बँकिंग म्हणजे, कर्जाऊ देण्याकरिता किंवा गुंतवणूक करण्याकरिता, लोकांकडून पैशाच्या ठेवी स्वीकारणे होय. या ठेवी मागणी केल्याबरोबर किंवा इतर प्रकारे परत करावयाच्या असतात आणि त्या धनादेश (चेक), धनाकर्ष (ड्राफ्ट), आज्ञा किंवा इतर प्रकारे काढून घेता येतात.
वर वर्णन केलेल्या व्यवसायाला ‘बँकिंग’ असे म्हणतात. बँकिंगचा व्यवसाय करणाऱ्या संस्थेला ‘बँक’ असे म्हणतात.
‘बँका आणि बँकिंग’ या विषयाचे सर्वांगीण दर्शन घडविण्याच्या प्रयत्नाित, प्रथम ‘बँक’ आणि ‘बँकिंग’ या दोन्ही संज्ञांचे अर्थ नंतर बँकिंगच्या उत्क्रांतीचा व विकासाचा सर्वसाधारण आलेख, बँकिंगच्या तत्त्वांचे स्पष्टीकरण आणि शेवटी भारतातील बँकिंगचा उगमापासून सद्यःस्थितीपर्यंतचा आढावा, असे एकंदर विवेचनाचे स्वरूप स्वीकारलेले आहे.
वैद्य, चिं. ग.
बँकिंगची उत्क्रांती आणि विकास
बँकिंगचे मूळ पुरातन काळापासून चालत आलेल्या सावकारी व नाण्यांची अदलाबदल तथा सराफी या व्यवसायांत आढळते. भारतात या व्यवसायातून पतपेढ्यांची निर्मिती झाली ह्या पेढ्या पाश्विमात्य पद्धतीचे बँकिंग येईपर्यंत भारतीयांच्या बँकिंग व्यवहारांचे एकमेव साधन होत्या. हल्ली त्यांचे कार्यक्षेत्र फारच मर्यादित झाले आहे तरी त्या विशिष्ट प्रकारच्या बँकव्यवसायात अजूनही तग धरून आहेत.