World Languages, asked by yashasvi31, 6 months ago

पुस्तकाची आत्मकथा in marathi​

Answers

Answered by gholapsanjay52
26

Explanation:

एक मोठ ग्रंथालय होत , तिथे अनेक लाखो पुस्तक होती, आणि त्यात मी मराठी पुस्तक ,अशी बरीच पुस्तक मराठीची होती त्या ग्रंथालयमध्ये पुस्तक वाचण्यासाठी बरीच मोठी जागा दिली होती . बरीच मुल माणसं आपल्या भाषेची व आवड़ी नावड़ी ची पुस्तके वाचत बसली होती . एक मुलगा आला , साध शर्ट – पैंट, पायात चपला , केसांचा एका बाजूला भांग विंचारलेला, तो मुलगा ग्रंथालयातल्या माणसाशी काहीतरी गुणगुणु लागला होता, मला खूप आनंद झाला कारण तो मुलगा त्या ग्रंथालयातल्या माणसाशी मराठी भाषेत बोलला मी मनात म्हणालों, म्हणजे हा मुलगा मराठीच आहे तो पुस्तक शोधन्यास लागला होता मी त्याला मोठ्या मोठ्याने हाका मारत होतो “अरे . . . . ये . . . . . बालका इकडे ये . . . . .

त्याने काही ऐकलीच नाही, आजूबाजूची पुस्तके मला खूप हसू लागली होती. तो मुलगा पुस्तक शोधत शोधत माझ्या जवळ येत होता अचानक त्याने चालण थांबवलं आणि एक पुस्तक काढलं, पण ते पुस्तकं पाहून माझं मन एकदम उदास झालं होत, कारण ते मराठी भाषेच पुस्तकं नसून ते दुसऱ्या भाषेचं पुस्तक होतं. चार वर्ष झाली मला कोणीच जवळ घेत नहूत . एका जागेत बसून माझ्या अवयवाचे तुकडे पडले होते त्या जागेत राहून माझा 'श्वास' अगदी कोंडला होता . माझ्या डोळ्यातुन पाणी येऊ लागलं होत पण ते दुसऱ्यांना कसं दिसणारं. अशाचवेळी एका बलवान मुलाने प्रवेश केला.अंगाने एकदम टापटीप,दोन्ही कानात रुद्राक्ष बाल्या ,कपाळाला भगवा टिळा, गळ्यात जाड रुद्राक्षाची माळ, तो ग्रंथालयात येताच मी डोळे पुसले. मी त्या मुलाला म्हणालो,

" ये रे ....ये.... माझ्या लेका.. ये.. मी तुझीच वाट बघत होतो अरे मला इकडून घेऊन जा रे खूप कंटाळा आला आहे रे मला इथे राहून....."

'तो मुलगा पुस्तकं शोधण्यास गुंग होता त्याला एक पुस्तकं दिसलं पण ते पुस्तकं खूप खालच्या थराला होतं म्हणून तो मुलगा 'जय शिवराय' बोलून तो खाली बसला ....। त्याने एक पुस्तकं काढलं पण त्याला ते आवडलं नाही, म्हणून त्याने आहे त्याच ठिकाणी ते पुस्तकं ठेवलं मी मनात म्हणालो "जय शिवराय म्हणजे ह्याला मराठी पुस्तकं हवं आहे" मी त्याला जोऱ्या जोऱ्यात हाका मारल्या पण त्याने काही लक्ष्य दिलं नाही तो मूलगा तिथून मागे फिरला बहुतेक त्याचा मुड ऑफ झाला असावा, त्याला हवं ते पुस्तक मिळालं नसेल म्हणून तो मागे फिरला तितक्यात मला एक युक्ती सुचली मी जर ह्या कपाटावरून उडी मारली तर ? मोठा आवाज येईल,पण माझे अवयव वेगवेगळे होतील .....माझे अवयव वेगळे झाले तरी चालतील पण माझा 'मराठी' ।

माणूस वेगळा होता कामा नये,मी जास्त विचार न करता कापाटावरून उडी मारली 'धप्पपsssss ' असा आवाज आला , माझे अवयव पूर्णपणे वेगवेगळे झाले.त्या मुलाला धाप्प असा आवाज कानी पडताच तो जागच्या जागी थांबला आणि मागे वळून पाहिलं तो मागे फटाफट आपले पाऊल टाकत टाकत माझ्याकडे आला तो खाली बसला जय शिवराय जय शिवराय हे नामस्मरण त्याचा तोंडात चालूच होतं, त्याने मला उचलून घेतलं माझी वेगळी झालेली अवयव त्याने व्यवस्थित जोडले आणि मला बंद केलं. त्याच लक्ष पाहिलं माझ्या अवयवाकडे गेलं त्याचे डोळे मोठे झाले तितक्यात त्याने जोरात हाक मारली राजे........... कारण माझ्या पहिल्या अवयवावर शिवाजी महाराज अस लिहलं होत त्या मुलाने 'राजे राजे ' म्हणत म्हणत त्याने मला मस्तकाला लावलं सगळी पुस्तक माणसे मुले हि आमच्याकडे बघत होती त्याने मला मस्तकावरून काढताच तो मला वाचत बसला मला खुप आनंद होत होता, कारण मी त्याच्या अगदी जवळ होतो तो पुस्तक वाचता वाचता त्याने अचानक मला बंद केलं आणि त्या ग्रंथालयातल्या माणसाकडे गेला त्यांना तो म्हणाला "सर हे पुस्तक मला घरी घेऊन जायचं आहे तर मला हे पुस्तक मिळाले का" ? ते मला म्हणाले "होय मिळेल फक्त चार दिवस....., प्रथम नाव घरचा पता सांग"त्या मुलाने पत्ता सांगितला तो मला हातात उचलून घेऊन निघून गेला मी सर्व पुस्तकांना राम- राम केलं,

मी त्याच्या घराजवळ पोहचलो होतो त्याच्या घराच्या बाहेर शिवाजी महाराजांचा फोटो होता त्याने त्याच्या घराची बेल वाजवली "ट्रिंग ट्रिंग" दरवाजा उघडला गेला त्याच्या घराला रंग हा 'भगवा' होता समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती होती, तो मुलगा मला आत घेऊन गेला आणि त्याने आईला हाक मारली ' ऐ आई ' तितक्यात आई स्वयंपाक घरातून बाहेर आली तो आईच्या पाय पडला मी मनात म्हणालो, "हा मुलगा खूपच संस्कृत दिसतो" तो आईला म्हणाला "आई हे बघ महाराजांचं 'पुस्तकं' त्याची आई मला बघून खूप खुश झाली तो आई ला म्हणाला आई हे 'पुस्तकं' आज मी वाचणार त्याशिवाय आज मी जेवणार नाही मी मनात विचार केला गेले चार वर्ष आगोदर एक मुलगा आला होता त्याने पंधरा ते वीस मिनिट पुस्तकं वाचलं, आणि हा मुलगा म्हणतो आहे मी पुस्तकं वाचल्याशिवाय जेवणार नाही. त्याने एक छोटासा लाकडी टेबलावर मला ठेवलं, मी 'जय शिवराय' म्हणून पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली , मी त्याच्या डोळ्यात बघत होतो कारण मला वाचताना त्याच्या डोळ्याची पापणी देखील हलत नव्हती. जस जस त्याच वाचून होत होतं, तस तस तो पान पलटत होता त्याच्या वाचण्यात सकाळ उलटून गेली होती त्यात निम्म पुस्तक वाचून झालं होत, पण त्याच अंग अचानक कापू लागलं होत, त्याचे डोळे मोठे झाले होते डोळयातून पाण्याचे थेंब माझ्या अंगावर पडत होते कारण तो महाराजांचा व महाराजांच्या मावळ्यांचा पराक्रम बघून त्याच अंगाच 'रक्त' सळसळू लागलं होत. रात्र झाली त्याच अर्ध्यापेक्षा जास्तच पुस्तकाची पान वाचून झाली होती मी विचार करू लागलो होतो, "ह्या मुलाला अजून भूक कशी लागली नाही". हळू हळू त्याचं पूर्ण पुस्तक वाचून झालं त्याने मला बंद केलं व डोळे मिटून शिवरायांचं नामस्मरण करू लागला होता काही वेळा नंतर त्याने डोळे उघडून मला देवाच्या देव्हाऱ्यात ठेवलं. मला रुद्राक्षची माळ घातली आणि माझ्या पाया पडला मी मनात म्हणालो, मी मुलं बघितली पण ह्या मुलांसारखी नाही. शिव-भक्त हवा तो असाच.

PLEASE MARK ME AS BRAINLIEST

Similar questions