पुस्तकाचे आत्मकथन निबंध
Answers
Explanation:
माझा जन्म एका लेखकाच्या हातून झाला आहे, माझ्या एका एका पानातून ज्ञानाचे भांडार वाहत असते.
पुस्तक म्हटल की वेगवेगळ्या अंदाजात वेगवेगळे ज्ञान प्राप्त होणे जसे इतीहासिक, गोष्टी, मनोरंजन, शुर गाथा, चालू घडामोडी, ई.
असेच मी एक गोष्टींचे पुस्तक आहे ज्यात भरपूर गोष्टींचा संग्रह आहे. मी जास्त करून लहान मुलांमध्ये घेळलो आहे. जणू मी लहान मुलांचा मित्र आहे.
जेव्हा लेखकाने मला लिहिले तेव्हा मी खूप नवीन दिसायचो, ते नवीन कव्हर, साफ स्वच्छ पाने. त्यानंतर मी एका पुस्तकात काही दिवस पडून राहिलो आणि मग एक लहान मुलगा आला ज्याने मला विकत घेतले आणि त्याच्या घरी घेऊन गेला.
त्याला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तो मला हातात घायचा आणि वाचायचा. जवळ जवळ तो अर्धा ते एक तास मला वाचायचा आणि मग जागच्या जागी व्यवस्थीत ठेवायचा.
मला त्याने एक छानसे खाली रंगाचे कव्हर घातले होते ते जणू माझे कपडेच होते. मला तो सतत वाचत असल्यामुळे माझ्यावर धूळ बसणे कदाचितच होते. तो माझी खूप निगा राखायचा आणि माझ्यासाठी एक स्वतंत्र जागा केली होती तेथे मी रोज राहायचो.
जस जसा तो मोठा होत गेला तस तसा त्याने मला संपूर्ण वाचून टाकले होते. त्यांनतर तो मला कदाचितच वाचत होता. मी जुने झाले होते, माझ्यावर सतत धूळ बसायची परंतु माझी साफ सफाई कधी कधी व्हायची.
नंतर मला त्याने त्याच्या एका मित्राकडे दिले मग तो माझी चांगली काळजी राखू लागला. तो मला रोज वाचू लागला आणि त्याने मला एक छानशी जागा केली होती तेथे तो मला नियमित ठेऊ लागला.
असे काही दिवस चालल्या नंतर त्याने देखील मला पूर्ण वाचून काढले मग पुन्हा मी एकटे पडले.
त्यानंतर त्याने मला एका रद्दी वाल्याला विकले मग काय मी कधी ह्या कोण्यात तर कधी त्या कोन्यात, कधी पुस्तकांमध्ये दाबलेलो तर कधी पेपर मध्ये दाबलेलो असायचो. असे माझे खूप हाल झाले मग त्याने मला मध्यातून दोन तुकडे करून फाडले. मला खूप इजा झाल्या आणि खूप निराश ही वाटू लागले. मग त्याने माझे कव्हर फाडले जणू असे वाटत होते जसे कोणी माझे पंखच कापले आहेत. नंतर माझे एक एक पण मोकळे केले आणि मला विकून टाकले.
माझे एक एक भाग वेगवेगळे झाले होते आणि मला एका वडापाव वाल्या दुकानदाराने विकत घेतले. तो माझ्या एक एक पानात वडापाव ठेऊन ग्राहकांना देत असे. ते गरम गरम वडापाव, त्यातील ते गरम तेल आणि चटणी वैगरे खूप इजा देत, खूप चटके बसत.
वडापाव खाल्यानंतर ग्राहक मला चोळामोळा करून कचरा कुंडीत टाकून देत तर कोणी रस्त्यावर फेकून देत. त्यातील एका व्यक्तीने वडापाव खाल्यानंतर मला वाचले त्या पानावरील एक छोटीशी गोष्ट वाचून त्यांचे मनोरंजन केले परंतु नंतर त्यांनीही मला चोळामोळा करून कचरा कुंडीत टाकले.
तेव्हा मला माझे मागील एक एक क्षण आठवत होता की कसे माझे पहिले मालक मला नीट ठेवत, माझी काळजी घेत, मला नवीन कव्हर लावले, माझ्यासाठी एक स्वतंत्र जागा केली तेथे ते मला नियमित ठेवत असत. तसेच माझ्या दुसऱ्या मालकाचे देखील क्षण मला आठवत होते कारण त्यांनीही माझी खूप काळजी घेतली. परंतु शेवटी त्यांचे काम झाल्यावर मला रद्दीच्या भावात विकून मोकळे झाले ते बागितल्यवर मला खूप वाईट वाटले.
अशी माझी जन्मल्या पासून तर नष्ट होण्यापर्यंत ची गोष्ट माझ्या आत्मकथा मध्ये आहे.
निष्कर्ष
पुस्तक म्हणजे जणू ज्ञानाचे सागरच असते कारण त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि खूप काही अनुभवायला मिळते.
खरंतर आपण जे पुस्तक विकत घेतो त्याला आपण नीट जपायला हवे, त्याला नवीन कव्हर लावायला हवे, त्याच्यावर धूळ बसता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. पुस्तक संपूर्ण वाचले गेल्यानंतर त्याला एका रद्दी वाल्याकडे न विकता त्याला आपल्या एका मित्राकडे किंवा एका गरीब गरजू व्यक्तीकडे द्यायला हवे आणि त्याला हे ही सांगायला हवे की तुझे वाचल्यानंतर ह्याला दुसरं एका गरजू व्यक्तीकडे दे परंतु त्याला रद्दी वाल्याला विकू नको.
ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला एवढे ज्ञान मिळते, आपण लहानाचे मोठे होतात आणि त्याच पुस्तकाला आपण काम झाल्यानंतर फेकून देतात तर ते चुकीचे आहे. त्याची खरी जागा एका वाचनालयात आहे किंवा आपल्या घरात एक छोटेशे वाचनालय बनवा ज्यात तुमचे सर्व पुस्तक ठेवता येतील.
वरील एका पुस्तकाची आत्मकथा निबंधा वरून असे लक्षात येते की कोणाचेही जीवन सोपे नसते तर निर्जीव वस्तूचे देखील जीवन कठीण असत ते.
Answer:
माझी सर्व पुस्तके एकत्र केली आणि त्यांना नीट साफ करून एक-एक करून रचू लागला तितक्यात माझ्या हाती माझे एक आवडते पुस्तक लागले, त्या पुस्तकाची दूरदर्शन खूप वाईट झाली होती. पुस्तकाची सर्व पाने निघू लागली होती. मी ते पुस्तक नीट करू लागला आणि तेव्हा मला वाटले जसे की पुस्तकाचे पाने फडफडून माझ्याशी काही बोलायचा प्रयत्न करत आहेत.
मी लक्ष देऊन ऐकू लागला ते पुस्तक काय बोलत आहे, तेव्हा माझ्या लक्षात आले की ते पुस्तक माझ्या वरती नाराज आहे कारण मी त्याची अवस्था खूप वाईट केली होती.
ते पुस्तक बोलु लागले माझा जन्म एका कारखान्यांमध्ये झाला जीथे माझ्या पांढऱ्याशुभ्र पानांवरती विविध महान भारतीयांचा इतिहास लिहला गेला, मला या गोष्टीचा खूप अभिमान होता आणि आता माझ्या जीवनाचे सार्थक होईल असे मला वाटले.
त्या कारखान्यातून मला थेट एका पुस्तकालया मध्ये पाठवण्यात आले मला वाटले होते आता माझ्या मधला इतिहास वाचण्यासाठी लोक माझ्याकडे धावत येतील, पण असे काही झाले नाही. लोकांना माझ्यामधील असलेल्या रोमांचक इतिहासा मध्ये काहीच रुची नव्हती. मग काय मी तसेच त्या पुस्तकालयात धूळ खात पडून राहिले होते. आणि मी वाट पाहत होते कधी कोणी येईल आणि माझा उपयोग करून घेईल.
मग शेवटी जेव्हा मला वाटू लागले कोणालाही माझ्या मधे रुची नाही अश्या वेळीस तू त्या पुस्तकालयात माझा शोध घेत आला, मला तेव्हा खूप आनंद झाला तू मला घरी आणले आणि माझ्या मध्ये असलेल्या इतिहासाचा आनंद घेऊ लागला. तू माझ्या मध्ये इतका गुतला होता की तुला मला वाचताना दुसरे काहीही भान राहत नव्हते.
मग काही दिवसांनी मला तू परत त्या पुस्तकालयात घेऊन गेला मला वाटले आता मला परत तिथे धूळखात राहावे लागेल पण तसे झाले नाही, तू मला विकत घेतले आणि मला घरी घेऊन आला तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण मला योग्य मालक भेटला असे मला वाटले होते.
मला तू काही दिवसापर्यंत वाचल नंतर मला तू एका टेबलावर ठेवले तिथे असलेले पाणी माझ्यावर पडले आणि मी पूर्णपणे भिजून गेले होते पण तुझं माझ्यावर लक्ष सुद्धा गेले नाही. मग आईने घरात झाडू मारताना मला उचलून कपटावर ठेवले आणि तेव्हा पासून आज पर्यंत मी तिथेच धुळी मधे पडून होते.
मला खूप वाईट वाटत होते इतक्या दिवस तिथे पडून-पडून माझी पाने निघू लागली होती मला वाटले आता माझे काही खरे नाही आणि आज तू मला परत हातात घेतले. पुस्तकाला गुरु ची महती दिली आहे म्हणून तर म्हणतात "ग्रंथ हेच गुरु". तुम्ही तुमच्या गुरु चा किती आदर करतात म तुम्ही आम्हा पुस्तकांचा आदर का करत नाही. आम्हाला सुधा भावना असतात आमच्या सोबत असा दुर्व्यवहार करू नका रे!. तितक्यात हवेने पुस्तकाची पाने पुन्हा फडफडले आणि मी निश्चय केला आज पासून मी माझ्या सर्व पुस्तकांचे योग्य काळजी घेईन