पोस्टमन ची वैशिष्ट्ये
Answers
Dear, You have got the Answer of your own question.
पोस्टमन मराठी निबंध बघणार आहोत. पोस्टमन ज्याप्रमाणे सफाई कामगार, दूधवाला, पेपरवाला, आपली कामे नियमितपणे करतात त्याचप्रमाणे पोस्टमनही समाजात जनसेवकाची महत्त्वाची भूमिका बजावतो. पोस्टमन घरोघर जाऊन पत्र, मानिऑर्डरी, रजिस्टर्ड पत्रांचे, पार्सलचे वाटप करतो.
पोस्टमन डाक व तारविभागातील एक सरकारी कर्मचारी आहे. त्याचे कार्य महत्त्वाचे व कठीण आहे. थंडी, ऊन, पावसातही त्याचे काम चालू असते. घरोघर जाऊन टपाल, तार, रजिस्ट्री वाटणे हे त्याचे दैनंदिन काम आहे. सरकारकडून त्याला मोफत गणवेश मिळतो.
रोज त्याला मुख्य टपाल कार्यालयातून ठराविक विभागाचे टपाल देण्यात येते. सायकलने जाऊन तो टपाल वाटप करतो. एक कर्तव्य तत्पर पोस्टमन प्रत्येक पत्र त्याच्या पत्त्यावर नेऊन देतो. पोस्टमन इमानदार असणे आवश्यक आहे. लहान गावे, खेडी जेथे अजूनही संपर्काची अन्य साधने नाहीत, अशा ठिकाणी पोस्टमनची वाट आतुरतेने पाहिली जाते. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी तर तो देवदूत असतो.
वाढदिवस, दीपावली, नूतन वर्ष आणि परीक्षेचे निकाल अशा सर्व प्रसंगी सगळे जण पोस्टमनची वाट पाहतात. अशा प्रसंगी अनेक शुभेच्छा पत्रे, भेटी पोस्टद्वारे लोक आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवितात. जेव्हा परीक्षेचे निकाल लागतात, तेव्हा विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांचे मित्र-मैत्रिणी पालक, स्नेही पोस्टमनला घेरतात. अशा वेळी बरेच लोक खुश होऊन पोस्टमनला बक्षिसी देतात, मिठाई देतात.
शहरात काम करणाऱ्या पोस्टमनपेक्षा खेड्यात काम करणाऱ्या पोस्टमनचे काम अवघड असते. चोर-लुटारूंची त्याला भीती असते. रस्ते खराब असतात, दोन खेड्यांत अंतर जास्त असते. सरकारने अशा ठिकाणी काम करणाऱ्या पोस्टमनच्या संरक्षणाची सोय करणे आवश्यक आहे.
महागाई खूप असल्यामुळे त्यांचा पगार वाढविला पाहिजे. त्यांना गरम कपडे व छत्री दिली पाहिजे. त्यामुळे त्यांची कार्यकुशलता वाढेल. अशा या जनतेच्या सेवकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.