*पोस्टमन इन द माउंटन ' हा कोणता परदेशी सिनेमा आहे ?*
1️⃣ जपानी
2️⃣ फ्रेंच
3️⃣ चिनी
4️⃣ रशियन
Answers
Answer:
'पोस्टमन इन द माउंटन' हा चीन या देशातील सिनेमा आहे. म्हणजेच चिनी सिनेमा आहे.
Explanation:
पोस्टमन इन द माउंटन हा सिनेमा १९९९ साली चीन या देशात प्रदर्शित झाला. उहो जिआंकी दिग्दर्शित हा सिनेमा लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो. हा सिनेमा एका वयोवृद्ध अशा माणसाची गोष्ट सांगतो. हा वयोवृद्ध माणूस एक पोस्टमन असतो आणि तो लवकरच निवृत्त होणार असतो आणि म्हणूनच तो आपल्या मुलाला आपले आपले काम शिकण्यासाठी सोबत घेऊन जातो. शहरातील टपाल वाटता वाटता शेवटी ते एका अंध वयोवृद्ध स्त्री च्या घरी पोहोचतात. जी खूप आतुरतेने आपल्या मुलाच्या पत्राची वाट बघत असते. पोस्टमन तिला तिच्या मुलाचे पत्र वाचून दाखवतो व त्या पत्रातून त्या स्त्रीला जगण्याची एक नवीन आशा मिळते. त्या स्त्रीला वाटते की तिचा मुलगा कधीतरी परत येईल व तिला घेऊन जाईल. त्या वृद्ध पोस्टमन च्या मुलाच्या लक्षात येते की खरं तर त्याचे वडील हे कोरा कागद वाचत होते. मुलाचे या प्रश्नाला उत्तर देताना पोस्टमन म्हणतो, त्याच्या खोट्या बोलण्यामुळे जर त्या स्त्रीला जगण्याचा आनंद मिळत असेल आणि तिचे शेवटचे दिवस आनंदात जात असतील तर याचा आनंदच आहे. तो आपल्या मुलाला फक्त कामच शिकवत नाही तर माणूस म्हणून कसे मोठे होता येईल याचे ज्ञान आपल्या कृतीतून देत असतो.