पैशाचा अतिरिक्त पुरवठा म्हणजे
Answers
Answer:
अर्थव्यवस्थेतील किंमतीची पातळी जेव्हा चढत जाते, तेव्हा ‘चलनवाढ’ होत आहे असे म्हणतात. याउलट किंमतीची पातळी जेव्हा घटत असते, तेव्हा ‘चलनघट’ होत आहे असे समजतात. चलनवाढ व चलनघट ह्या सर्वस्वी चलनविषयक घटना होत, हा विचार जागतिक महामंदीपर्यंतच्या काळात मान्यता पावलेला होता. परंतु केन्सप्रणीत विचारसरणीप्रमाणे जर अर्थव्यवस्था अपूर्ण रोजगाराच्या अवस्थेत असेल, तर पैशाचा पुरवठा वाढल्यास किंमतीबरोबर रोजगारही वाढतो. ही ‘अपूर्ण चलनवाढ’ किंवा ‘सौम्य चलनवाढ’ होय.
पूर्ण रोजगाराची अवस्था गाठण्यासाठी ती पोषक ठरके. याउलट, पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीत पैशाचा पुरवठा वाढल्यास उत्पादन व रोजगार यांमध्ये कोणतीही वाढ न होता किंमतीची पातळी वाढते, ही ‘पूर्ण चलनवाढ’ होय. याच परिस्थितीला खऱ्या अर्थाने चलनवाढ असे म्हटले जाते. द्रुतगतीने वाढणाऱ्या किंमती व अतिरिक्त मागणी ही चलनवाढीची दोन प्रमुख लक्षणे होत. अविकसित अर्थव्यवस्थेत काही मूलभूत अडथळ्यांमुळे पूर्ण रोजगार नसतानाही पैशाचा पुरवठा वाढल्यास चलनवाढ उद्भवते. चलनवाढविरोधी उपाय योजल्यामुळे उत्पादन व रोजगार कमी न होता, किंमती कमी होत असल्यास ‘चलनवृद्धिरोध’ निर्माण होतो. ही स्थिती आर्थिक स्थैर्याला हितकारक असते. मात्र पूर्ण रोजगाराच्या पातळीखाली जेव्हा किंमती घसरू लागतात, तेव्हा ‘चलनघट’ अस्तित्वात येते. यावेळी किंमती घसरत असतानाच उत्पादन आणि रोजगारही कमी होतात. चलनवाढविरोधी धोरणाचा अतिरेक, पुरवठ्यात कमालीची वाढ, किंवा प्रतिकूल व्यापारशेषामुळे पैशाची विदेशी निर्यात होऊन ही आपत्ती ओढवते. ही स्थिती आर्थिक स्थैर्याला घातक असल्याने टाळणे आवश्यक असते.