Economy, asked by pisalshrikant2, 17 days ago

पैशाच्या मूल्य ची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा?

Answers

Answered by salvev755
0

Answer:

विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा. आधुनिक अर्थव्यवस्था श्रमविभागणी व देवघेव ह्यांवर आधारलेली आहे. उप्तादक घटकांचा मोबदला देण्याकरिता, कर्जाचे व्यवहार पुरे करण्याकरिता पैशाचा उपयोग केला जातो. वस्तू किंवा सेवा यांची देवघेव सर्वमान्य विनिमय माध्यमाद्वारे होण्यापूर्वी वस्तूंची किंवा सेवांची प्रत्यक्षपणे देवघेव होत असे. मीठ देऊन कापड घेणे, गवंडीकामाचा मोबदला धान्याच्या रूपात देणे अशा पद्धतीचे वस्तुविनिमयावर आधारलेले व्यवहार प्रगत मानवजातीस गैरसोयीचे वाटू लागले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून एखादी वस्तू वापरणे. पिसे, हाडे, धान्य, हत्तीचे दात, वाघाचे कातडे, मेढी, घोडे, हत्ती आदी वस्तूंचा आणि जनावरांचा जगाच्या विविध भागांत विनिमय माध्यम म्हणून उपयोग करण्यात येत असे. पैशाच्या उत्क्रांतीमधील पुढील टप्पे म्हणजे नाणी, कागदी चलन आणि पतपैसा हे होत. नाणी व कागदी चलन सरकारमान्य पैसा होय. बँकनिर्मित पतपैशाचा देवघेवीचे साधन म्हणून उपयोग होत असला, तरी त्यास सरकारी पाठबळ नसते. त्यामुळे तो स्वीकारलाच पाहिजे असे कायदेशीर बंधन नसते.

Similar questions