पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्व साधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होतो
Answers
सागरी प्रवाह
सागरी प्रवाहाची वैशिष्ट्ये
सागरी प्रवाहांचे परिणाम
सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी,सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल आहे. सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते. तसेच सागरी प्रवाहांमुळे सागरपृष्ठापासून सागरतळापर्यंत अभिसरण चालू राहते. वाऱ्याची सागरजलाशी होणारी घर्षणक्रिया, वेगवेगळ्या जलस्तरांधील घर्षणक्रिया, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी कोरिऑलिस प्रेरणा (भूवलनोत्पन्न प्रेरणा), सागरजलाचे तापमान, लवणता व घनतेतील तफावत इ. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रेरणांवर सागरी प्रवाहांची निर्मिती, त्यांची दिशा व आकार अवलंबून असतो. खंडांचे आकार व त्यांची सापेक्ष स्थाने, प्रवाळशैलभित्ती व प्रवाळबेटे, स्थानिक वारे या घटकांचाही सागरी प्रवाहांवर प्रभाव पडत असतो. या वेगवेगळ्या घटकांमधील भिन्नतेमुळे काही प्रवाह मोठे, काही लहान, काही कायमस्वरूपी, काही हंगामी, काही अधिक गती असणारे तर काही मंद गतीने वाहणारे आढळतात.
वाऱ्याचे घर्षणकार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची मूळ कारणे आहेत. सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते. सागरी प्रवाहाचे पृष्ठीय प्रवाह, घनतेतील फरकाने निर्माण झालेले प्रवाह, खोल सागरातील प्रवाह असे प्रकार पाडता येतात. समुद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ व एकसारखा वारा वाहत असल्यास त्याच्या घर्षण कार्यामुळे काही ऊर्जा पाण्यात संक्रमित झाल्यामुळे सागरपृष्ठावरील पाणी प्रवाहित होते. यालाच ‘पृष्ठीय प्रवाह’ असे म्हणतात. वाऱ्याचा प्रभाव सामान्यपणे सागरातील १००–२०० मी. खोलीपर्यंतच्या पाण्यावर होतो. असे असले तरी वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रवाहांचा विस्तार १,००० मी. किंवा त्यापेक्षाही अधिक खोलीपर्यंत आढळतो. स्थूलमानाने असे प्रवाह प्रचलित वाऱ्याच्या दिशेला अनुसरून वाहत असले, तरी ते अगदी बरोबर वाऱ्याच्या दिशेने वाहत नाहीत.
पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. सागरी प्रवाहांचे हे विचलन वाऱ्याच्या दिशेपासून साधारणतः ४५० नी होते. कोरिऑलिस प्रेरणेमुळेच सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्घ दिशेने वाहतात. याच प्रेरणेमुळे खंडांच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांच्या विरुद्घ दिशेने खंडांच्या पूर्व
Explanation:
पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते .
उत्तर - अयोग्य
दुरुस्त विधान - पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशांत व त्याच प्रमाणे धुळे प्रदेशांतही होते .