पोषक आहाराचे महत्त्व आईस पत्र
Answers
◆◆पोषक आहाराचे महत्व सांगणारे पत्र आईला लिहा:◆◆
२,अमरस्मृती,
चाररस्ता,
नासिक -४२२००१.
दिनांक:२२ डिसेंबर, २०१९.
तीर्थरूप आईस,
सप्रेम नमस्कार.
कालच बाबांचे पत्र मिळाले.ते पत्र वाचून खूप वाईट वाटले.पत्रातून कळाले की तू तुझ्या आहाराकडे नीट लक्ष देत नाहीस.
आई तू आमच्या सगळ्यांची इतकी काळजी घेते,मग स्वतःच्या आहाराकडे का लक्ष देत नाही?तू वेळेवर जेवत नाहीस, पोषक आहाराचे सेवन करत नाहीस.आई,हे चुकीचे आहे.पोषक आहार खूप महत्वाचे असते.
पोषक आहारामुळे आपले शरीर निरोगी व स्वस्थ बनते.आहारातील जीवनसत्वे आणि खनिज पदार्थांमुळे आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढते.
यामुळे आपण आजारांपासून दूर राहतो आणि आपले वजन नियंत्रणात राहते.पोषक आहारामुळे आपल्या शरीराची उत्तम वाढ आणि विकास होते.
मी आशा करते की तू स्वतःच्या आहाराकडे लक्ष देशील.
बाबांना माझा नमस्कार आणि छोट्या राहुलला अनेक आशीर्वाद.
तुझी लाडकी,
अवनी.