Hindi, asked by ujadhav989, 1 month ago

पोषण कशाला म्हणतात ?​

Answers

Answered by seinirmal12
4

Explanation:

पोषण : एककोशिकीय (एकाच पेशीच्या बनलेल्या) जीवांपासून ते जटिल अशा स्तनी प्राण्यांपर्यंतच्या सर्व प्राण्यांना व वनस्पतींना त्यांच्या क्रियाशील जीवनासाठी आणि यशस्वी प्रजोत्पादनासाठी वा पुनरुत्पादनासाठी काही खाद्य पदार्थ किमान स्वरूपात व प्रमाणात लागतात. हे पदार्थ काय आहेत? त्यांचे कार्य असे होते? या पदार्थांचे प्रमाण कमी वा जास्त झाल्यास काय परिणाम होतात? पोटात गेल्यावर त्यांचे काय होते? इत्यादी तत्संबंधी प्रश्नांशी पोषण निगडित आहे. ‘अत्राचे शास्त्र व त्यातील पोषक घटक आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध’ अशी पोषणाची व्याख्या करता येईल. ⇨जीवरसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि एंझाइमविज्ञान (सजीव कोशिकांमध्ये तयार होणाऱ्या व रासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिन संयुगांचे विज्ञान) ह्या शास्त्रांशी पोषणाचा संबंध येतो. पोषण आणि ही शास्त्रे एकमेकांत इतकी गुंफलेली आहेत की, काही वेळा त्यांच्यातील फरक दाखविणे शक्य होत नाही.

Answered by pandhurangjadhav92
0

Answer:

सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात

Similar questions