World Languages, asked by krish543, 5 months ago

*पाठात आलेल्या रानमेव्याचे नाव ओळखा.* 1️⃣ ढाळे 2️⃣ शेंदाडं 3️⃣ भाजलेली कणसे 4️⃣ सर्व पर्याय बरोबर

Answers

Answered by bhumi9794
4

Answer:

पावसाळा साधून गांवी निघालो की, गांवचा ओढा आतां भरून वहात असेल, निर्मळ धारेत बसून अंघोळ करावी.

आजारी माणसाला जशी कांहीबांही खाण्याची वासना होते, तसेच हे होते. मी कांही गांवाला फार वर्षांनी जात होतो अशांतला प्रकार नव्हता. वर्षा-दोन वर्षांनी एखादी धांवीत भेट होतेच, नाही असे नाही; पण गेल्या अनेक वर्षांत गांवच्या ओढ्यात मी अंघोळ केली नव्हती. आठवण करून पाहिले तर, काळ जवळजवळ बारा-तेरा वर्षांचा गेला आहे असे दिसून आले. निर्मळ धारेत माशासारखे पोहून जवळजवळ तप लोटले होते! गांवचा ओढा सोडला तरी या एवढ्या काळांत दुसऱ्या कुठल्याही ओढ्यात अंघोळ केल्याचे स्मरेना. इतकी वर्षे झाली, कावळ्याच्या डोळ्यासारखा स्वच्छ धारेत मी कधी पडलोच नव्हतो; झुळूझुळू वाहणारी धार पाठीपोटावरून खळाळत गेली नव्हती; चिंगळ्या माशांचे कळप अंगावरून खेळले नव्हते. वरून पाहिले तर साधी वाळू, पण पाण्यांत बुडून डोळे उघडले की वाळूचे रंगीबेरंगी खडे कसे मोठ्यामोठ्या माणिकमोत्यांसारखे दिसतात! ते धन कितीतरी दिवसांत मी पाहिलेंच नव्हते. उन्हाची तिरीप धारेवर पडल्यावर धारेच्या मध्यभागी विणली जाणारी तिपेडी-चौपेडी पाण्याची वेणी कशी रूप्यासाररखी चमकते! खूप वेळ पाण्यांत राहिल्यावर हातापायांचे तळवे कसे पांढरे-स्वच्छ, फिक्कट गुलाबी दिसूं लागतात! बोटांच्या शेवटांना सुरकुत्या पडतात, धारेंतून बाहेर काढले की, अंगावर कसे रोमांच उभे रहातात! — कितीतरी वर्षे झाली, माझे तळवे धारेने असे कधी पांढरट गुलाबी झाले नव्हते; माझ्या अंगावर कधी रोमांच उभे राहिले नव्हते!...

Answered by jadhavsorav
1

Explanation:

*वेगळा घटक ओळखा. पुटीका ग्रंथी संप्रेरक, टेस्टेस्टेरॉन, ल्युटीनायझिंग संप्रेरक, इस्ट्रोजन.*

1️⃣ इस्ट्रोजन

2️⃣ ल्युटीनायझिंग संप्रेरक

3️⃣ टेस्टेस्टेरॉन

4️⃣ पुटीका ग्रंथी संप्रेरक

Similar questions