Hindi, asked by tabish6123, 1 year ago

पृथ्वी बोलू लागली तर निबंध मराठी

Answers

Answered by arvisakshi
137
पृथ्वी बोलु लागली तर ,तिला असे वाटेल की माणसाची प्रगती झाली नव्हती तेव्हा मी किती सुंदर होते. किती छान झाडे होती, हिरवळ होती. निळे आकाश होते. परंतु मानवाची जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी मी प्रदुशीत होत गेले.
स्वच्छ नद्यांमध्ये
Answered by gionee47
49

पृथ्वी बोलू लागली तर..

"मी तुझी धरतीमाता , म्हणजेच पृथ्वी बोलतेय !

माझी कथा आणि व्यथा ऐक ! माझा जन्म झाला तेव्हा मी अवकाशात फिरणारा एक तप्त गोल होते. कालांतराने मी थंड होत गेली. माझ्यावर वातावरणनिर्मिती झाली. पाणी निर्माण झाले. मग वनस्पती व छोटे छोटे जीव निर्माण झाले.

उत्क्रांती होत होत शेवटी तुमच्या पूर्वजांनी जन्म घेतला.

तेव्हापासून मी माझ्या लेक्रांसाठी अपार मेहनत केली आहे.

माझ्या अंत रंगाची उलथापालथ करून मी मानवा साठी अनेक प्रकारच्या वनस्पती , अन्नधान्य , फळे , फुलें निर्माण केली. त्या सर्वांचा मानवाने उपभोग घेतला.

मानवाने विज्ञानाची साथ घेऊन मला आणि माझ्यावरील निसर्गाला राबवले . हे पाहून मला खूप आनंद झाला . पण हाच मानव पुढे स्वार्थी बनला. तो माझ्या वर सत्ता गाजवू लागला वा माझ्या वर मालकी करू लागला. त्यासाठी एकमेकांत भांडणे करू लागला , युद्धे करू लागला.

मला आता माझ्या लेकरांना असे सांगावे वाटते की , ज्या विज्ञानाने मानवाला प्रचंड शक्ती दिली , मानवाच्या सुखासाठी राबवले त्या विज्ञानाचा उपयोग मानवाने मानवाच्या भल्यासाठीच करायला हवा. प्रदूषण थांबवावं.

मी मानवाला मिळालेले वरदान आहे , मी सर्वांसाठी आहे. उगाचच माझी कल्पनिक रेषांच्या साहाय्याने विभागणी करणे व त्यासाठी वाद घालून युद्धे करणे हा मानवाचा मूर्खपणा आहे, हे सारे मानवाने टाळले नाही, तर त्याला पश्चाताप करण्याची पाळी येईल ,"

एवढे बोलून पृथ्वी थांबली.

Similar questions