पृथ्वीचा अंतर रंगा की आकृति
Answers
भूकंपतरंगाचे मुख्यतः प्राथमिक, द्वितीयक आणि पृष्ठतरंग असे तीन प्रकार असतात. यांपैकी प्राथमिक आणि द्वितीयक तरंग कवचाखाली शिरून निरनिराळ्या खोलीच्या थरांतून प्रवास करीत भूकंप नोंदणी केंद्राशी पोहोचतात. पृष्ठतरंग मात्र केवळ पृष्ठालगतच्या कवचातूनच प्रवास करतात. यांपैकी प्राथमिक व द्वितीयक तरंगांमुळे पृथ्वीच्या अंतर्भागासंबंधी खूपच महत्त्वाची माहिती मिळू सकते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तो मध्यापर्यंत सर्वत्र सारख्याच भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा पदार्थ असता, तर हे तरंग त्यातून प्रवास करताना विचलित न होता सरळ रेषेत गेले असते; पण प्रत्यक्षात असे दिसते की, खोलीनुसार तेथील पदार्थाची दृढता वाढत जाते. त्यामुळे या तरंगांचा वेगही वाढत जातो आणि प्रकाश किरणांप्रमाणे या तरंगाचे प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्यात जाताना दिशेत बदल होण्याची क्रिया) होऊन त्यांचा प्रवासमार्ग गाभ्याकडे बहिर्गोल झालेला दिसून येतो.
भूकंपतरंगांच्या अभ्यासावरून पृथ्वीची पृष्ठभागापासून तो मध्यापर्यंतची रचना ही पृष्ठभाग ते सु. १०-७० किमी. खोलीपर्यंत कवच, त्याच्याखाली २,९०० किमी. खोलीपर्यंत प्रावरण व त्याच्या खाली मध्यापर्यंत गाभा अशा तीन प्रकारच्या संकेंद्री (एकच केंद्र असलेल्या) थरांची असल्याचे आढळून आले आहे. कवचाची जाडी भूखंडांखाली सर्वांत जास्त व महासागरांच्या तळाखाली कमीत कमी असते. कवचाच्या तळाशी व प्रावरणाच्या वरच्या सीमेशी भूकंपतरंगांच्या वेगात एकाएकी बरीच वाढ झालेली दिसते. १९०९ मध्ये आंद्रिया मोहोरोव्हिसिक यांनी हे सत्य प्रथम उजेडात आणले त्यावरून या सीमापृष्ठाला ‘मोहोरोव्हिसिक असांतत्य सीमा’ असे नाव दिले आहे.
प्रावरणाच्या वरच्या सीमेशी प्राथमिक वरच्या सीमेशी प्राथमिक तरंगांचा वेग ७.८ ते ८.१ किमी./से. असतो. जसजसे अधिक खोल जावे तसतसा हा वेग वाढत जाऊन प्रावरणाच्या तळाशी म्हणजे २,९०० किमी. खोलीवर तो १३.६ किमी./से. होतो. याच खोलीवर द्वितीयक तरंगांचा वेग अनुक्रमे ४.३५ किमी./ से. पासून वाढत जाऊन २,९०० किमी. खोलीवर तो ७.२५ किमी./से. होतो. २,९०० किमी. खोलीपर्यंत जाणारे तरंग गाभ्याच्या दिशेने बहिर्वक्र असलेल्या मार्गाने प्रवास करीत भूकंपाच्या उगमकेंद्रापासून पृष्ठभागावर ११,५०० किमी. अंतरावर असणाऱ्याजागी पोहोचतात.
मात्र येथून पुढच्या ४,५०० किमी. अंतरापर्यंतच्या पट्ट्यातील कोणत्याही जागी प्राथमिक किंवा द्वितीयक तरंगांची नोंद होत नाही. फक्त पृष्ठतरंग मात्र पृष्ठालगतच्या भागातून येत असल्यामुळे त्यांची नोंद या पट्ट्यातील केंद्रात होते. त्यानंतरच्या पुढच्या म्हणजे उगम केंद्रापासून १६,००० किमी. पेक्षा अधिक अंतरावर असणाऱ्यास्थानापासून तो उगमकेंद्रापासून १६,००० किमी. पेक्षा अधिक अंतरावर असणाऱ्या स्थानापासून तो उगमकेंद्राच्या बरोबर विरुद्धपदी असणाऱ्या स्थानापर्यंतच्या सर्व केंद्रात फक्त प्राथमिक तरंग पोहोचल्याची नोंद होते; पण या नोंदणी केंद्रातही द्वितीयक तरंग येत नाहीत.
थोडक्यात या घटनेमुळे पुरेशा महत्तेच्या प्रत्येक भूकंपामुळे उगमकेंद्रापासून भूपृष्ठावर ठराविक अंतरावर असणारा कड्याच्या आकाराचा असा एक छायापट्ट दिसून येतो. या छायापट्टातील कोणत्याही नोंदणी केंद्रात प्राथमिक व द्वितीयक तरंग पोहोचू शकत नाहीत.
१९०६ मध्ये आर. डी. ओल्डॅम यांनी भूकंपामुळे असा छायापट्ट निर्माण होत असल्याचे निरीक्षण केले व त्यावरून पृथ्वीच्या मध्याशी खूप जास्त घनता असलेल्या पदार्थाचा गाभा असावा, असे अनुमान त्यांनी केले. गाभ्यातून प्रवास करताना प्राथमिक तरंगांचे प्रणमन अधिक होऊन त्यांच्या वेगात फार मोठी घट होते. त्यामुळे एकाद्या काचेच्या गोळ्यातून प्रकाशकिरण एकवटावेत तसे गाभ्यामुळे उगमकेंद्राच्या विरुद्ध बाजूला असलेल्या जागी प्राथमिक तरंग एकत्रित होतात आणि त्यामुळे पृष्ठभागावर मधल्या भागात छायापट्ट निर्माण होतो, असे स्पष्टीकरण ओल्डॅम यांनी दिले होते.
गाभ्यामध्ये द्वतीयक तरंग शिरून पुढे प्रवास करू शकत नाहीत आणि द्वितीयक तरंग हे अवतरंग (ज्यात माध्यमाच्या कणांचे कंपन तरंग प्रसारणाच्या दिशेशी लंब दिशेत असते) असून असे तरंग द्रव माध्यमातून प्रवास करण्यास असमर्थ असतात. यावरून गाभ्यातील पदार्थ द्रव स्थितीत, मुख्यतः वितळलेल्या लोहाचा बनलेला असावा, असेही अनुमान करण्यात आले.
बेनो गूटेनबेर्क यांनी १९१३ मध्ये भूकंपतरंगांच्या मापनांचा अभ्यास करून त्यावरून गाभ्याचे अस्तित्व निर्विवादपणे सिद्ध केले. गाभ्यातून द्वितीयक तरंग जाऊ शकत नसल्यामुळे तो संपूर्णतः द्रव स्थितीत असावा अशी पूर्वीची कल्पना होती; पण १९३६ मध्ये इंगे लीमान या डॅनिश भूकंपतज्ञ महिलेने गाभ्यामध्ये आणखी एक अस्पष्ट सीमा असून त्याखालच्या गाभ्याचा भाग घन स्थितीत असावा, असा निष्कर्ष काढला.
Explanation:
पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.