पृथ्वीचा पृष्टभागास ----- पासून उष्णता मिळते
Answers
Answer:
सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम
सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणामसूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळत असते. शिवाय सूर्यापासून येणारे जंबुपार प्रारण, सौरवाताचा स्थिर प्रवाह आणि मोठ्या उज्ज्वालांची कणमय वादळे यांचा पृथ्वीवर परिणाम होतो. सूर्यापासून येणाऱ्या जंबुपार भागालगतच्या प्रारणाने पृथ्वीभोवती ओझोनाचा थर निर्माण होतो व पर्यायाने तो थर पृथ्वीचे अशा प्रारणापासून ढालीप्रमाणे रक्षण करतो. सौर किरिटापासून येणाऱ्या दीर्घ तरंगलांबीच्या मृदू क्ष-किरणांमुळे ⇨ आयनांबरा चे काही थर निर्माण होतात. या थरांमुळे लघुतरंग रेडिओ संदेशवहन शक्य होते. उज्ज्वालांपासून येणाऱ्या कमी तरंगलांबीच्या अधिक कठीण क्ष-किरण स्पंदांनी आयनांबरातील सर्वांत खालचे थर आयनीभूत होतात व रेडिओ संदेशवहनाचे अपायन वा अस्त होतो. पृथ्वीचे परिभ्रमी चुंबकीय क्षेत्र सौरवात अडविण्याच्या दृष्टीने पुरेसे तीव्र असते व त्यामुळे ⇨ चुंबकांबर बनते आणि त्याच्याभोवती सौर कण व क्षेत्रे वाहतात. सूर्याविरुद्घ असलेल्या बाजूला क्षेत्ररेषा ताणल्या जाऊन एक संरचना तयार होते. तिला चुंबकीय पुच्छ म्हणतात. सौरवातात आघात निर्माण होतात, तेव्हा पृथ्वीच्या चुबंकीय क्षेत्रात थोडी वा तीव्र वृद्घी होते. जेव्हा आंतरग्रहीय क्षेत्र पृथ्वीच्या क्षेत्राच्या दिशेच्या विरुद्घ दिशेला बदलले जाते किंवा कणांचे मोठे ढग प्रवेश करतात, तेव्हा चुंबकीय पुच्छातील क्षेत्रे परत जोडली जातात व ऊर्जा मुक्त होते. यातून ⇨ ध्रुवीय प्रकाश निर्माण होतो. मोठ्या उज्ज्वाला किंवा किरिटाच्या द्रव्यमानाची उत्क्षेपणे यांच्यामुळे ऊर्जावान कणांचे ढग आणले जातात. त्यांच्यामुळे चुंबकांबराभोवती वलय प्रवाह निर्माण होतो. त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात तीव्र चढ-उतार होतात, त्यांना भूचुंबकीय वादळे म्हणतात. या आविष्कारांमुळे रेडिओ संदेशवहनात क्षोभ निर्माण होतात आणि दूर अंतरासाठीच्या प्रेषण तारांमध्ये व इतर दीर्घ लांबीच्या संवाहकांमध्ये विद्युत् दाब ऊर्मी निर्माण होतात.

उपयोगिता
Explanation: