पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कवच
कशाचे बनलेले आहे
Answers
पृथ्वीच्या पूर्वी एक मोठी पृथ्वी होती. त्यावर काहीतरी प्रचंड आदळले आणि त्यातून चंद्र फुटून बाहेर पडला असा एक कयास आहे. त्यानंतर अंतरिक्षातले खूप काही लहान-मोठे आदळत राहिले, परंतु ते मात्र पृथ्वीने सामावून घेतले अशी कथा सांगतात.
रविन थत्ते
पृथ्वीच्या पूर्वी एक मोठी पृथ्वी होती. त्यावर काहीतरी प्रचंड आदळले आणि त्यातून चंद्र फुटून बाहेर पडला असा एक कयास आहे. त्यानंतर अंतरिक्षातले खूप काही लहान-मोठे आदळत राहिले, परंतु ते मात्र पृथ्वीने सामावून घेतले अशी कथा सांगतात. आपल्यात पृथ्वीला ‘क्षमा’ म्हणतात ते उगीच नाही. पृथ्वी एकेकाळी वायुमेघ होती पण त्या वायूतला हायड्रोजन आता नावापुरताही शिल्लक नाही. आहेत ते त्या वायूचे नंतरचे वंशज मुख्यतः लोखंड आणि सिलिका म्हणजे अभ्रक. पृथ्वीच्या गर्भात रसरशीत अतिउष्ण असा लोखंडाचा प्रचंड दाबामुळे घट्ट झालेला गोळा आहे. त्याच्या बाहेर बहिर्गर्भात वितळलेले लोखंड फेऱ्या मारते आहे. त्याच्या बाहेरचे आवरण उष्णच आहे. बऱ्यापैकी घट्ट आहे, परंतु लवचिक आहे. लोहार वाकवतात त्या स्थितीतले आणि त्याच्याबाहेर पृथ्वीचे कवच आहे, त्यात सिलिका किंवा अभ्रकाचे राज्य आहे. प्लास्टिकच्या आधी कचकड्याच्या वस्तू असत किंवा गारगोटी किंवा नर्मदेतला गोटा हे सगळे सिलिकाचे नातेवाईक. हा गडी टिकावू असतो. वाळूतही तोच असतो. पारदर्शकही होऊ शकतो. आणि अलिप्त राहतो. म्हणूनच मोतीबिंदू काढल्यावर सिलिकाच्या पारदर्शक संयुगाची भिंग