पृथ्वीगोल व कागदावरील नकाशातील फरक सांग.
Answers
Answered by
84
पृथ्वीगोल
- पृथ्वीगोल म्हणजे "पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती"
- पृथ्वीगोल हा त्रिमितीय आहे
- पृथ्वी गोला वर अक्षवृते व रेखावृते याची वृतजाळी तयार करता येते.
नकाशा
- नकाशा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे रेखाचित्र किंवा जे योजना (भाग) जे देश, नद्या, पर्वत, रस्ते इत्यादी दर्शवते
- नकाशा हा द्विमितीय आहे
- नकाशा वरुन आपणास कोणताही प्रदेशाची लांबी व रुंदी समजते .
Answered by
3
पृथ्वीगोल व कागदावरील नकाशातील फरक:-
- पृथ्वीगोल:-
- पृथ्वीगोल म्हणजे "पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती होय". पृथाविगोल हा त्रिमितीय आहे.तसेच विशिष्ठ प्रमाणावर काढल्यास पृथ्वीवरील अनेक घटकाची निश्चित माहिती देऊ शकतो.
- पृथ्वी गोलावर अक्षवृते व रेखावृते याची वृतजाळी तयार करता येते. त्यामुळे पृथ्वी वरील कोणत्याही प्रदेशाचे क्षेत्रफळ,दोन ठिकाणामधील अंतर आणि दिशा याची योग्य माहिती मिळू शकते.
- पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेश,विषुववृत्तीय प्रदेश,त्याचप्रमाणे भूमिखंडे व महासागर यांच्यात आकारासंबंधी आकलन करता येते. पृथ्वीगोल भूगोल शास्त्राच्या अभ्यासात अधिक महत्व असले तरी प्रत्येक वेळी व प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग करता येणे शक्य होत नाही.
- कारण पृथ्वीगोल काही विशिष्ठ प्रमाणावर तयार केलेले असतात.ते सर्वच ठिकाणी सहजपणे बरोबर किंवा सोबत बाळगणे शक्य नाही.हे सर्व घटक लक्षात घेऊन पृथ्वीगोल काढणे शक्य नाही.
- नकाशा:-
- नकाशा हा द्विमितीय असून त्यावरुन आपणास कोणताही प्रदेशाची लांबी व रुंदी समजते .
- परंतु जर त्यामध्ये उठाव दर्शवणाऱ्या पद्धतीचा वापर केला तर उंची व खोली यांची सुद्धा सापेक्ष कल्पना येते.तरी सुद्धा पृथ्वी गोला इतकी क्षेत्रफळ,अंतर व दिशा याची अचूक कल्पना करता येत नाही.
- परंतु नकाशा हा विवध हेतू लक्षात घेऊन काही विशिष्ठ प्रदेशासाठी तयार करिता येऊ शकतो. त्याचप्रमाणे नकाशे हे कुठेही सहजपणे सोबत बाळगता येतात.त्यामुळे नकाशाचे महत्व दिवसन दिवस वाढत आहे.
एई था, पृथ्वीगोल व कागदावरील नकाशातील फरक
#SPJ3
Similar questions