Geography, asked by abhaymishraa3366, 11 months ago

पृथ्वी ही किती अंतराने केलेली आहे

Answers

Answered by sharonthomas28
0

Answer:

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.

पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.

पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे २० सेकंद लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती; पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी.

पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही गृहावर जीवसृष्टी नाही.पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रवीय क्षेत्राकडे वळतात.

please mark me as the brainliest

Similar questions