India Languages, asked by vimlakshkhadse, 10 months ago

० पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे​

Answers

Answered by newday
26
आपल्या आजुबाजूला असणाऱ्या सर्व सजीव-निर्जीव गोष्टी, नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तू, दृश्‍य-अदृश्‍य भाव हे पर्यावरणाचे घटक असतात व त्यांचा आपल्यावर सातत्याने बरा वाईट परिणाम होत असतो. वातावरणातील इलेक्‍ट्रोमॅगनेटिक रेडिएशन असो, मोबाईल किंवा वायफायचे तरंग असोत, चुंबकीय लहरी असोत, रेडिओचे तरंग असोत, या सर्वांचा पर्यावरणात समावेश होत असतो. जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी, सूर्यप्रकाश, हवा हे सुद्धा पर्यावरणाचे घटक असतात. आकाशातील ग्रह-तारे किंवा पृथ्वी भोवतालचे अवकाश यांचाही पर्यावरणात अंतर्भाव होतो. पर्यावरणाच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टींशी बांधलेलो असतो आणि म्हणूनच पर्यावरण सुस्थितीत असले, पर्यावरणातील सर्व घटक निरोगी असले तरच आपल्या आरोग्याचे रक्षण होऊ शकते. याउलट पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाची दुष्टी ही संपूर्ण सृष्टीसाठी घातक ठरू शकते. 

पर्यावरणाला वाचवण्यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न होत आहेत, अनेक देशांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याचेच प्रतिक म्हणून १९७४ पासून प्रत्येक वर्षी जूनच्या ५ तारखेला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने पर्यावरणरक्षणासाठी जनसामान्यांमधे जागरूकता निर्माण केली जाते. आपण सर्वांनीच या मोहिमेमधे सहभागी व्हायला हवे, रोजचे जीवन जगताना पर्यावरणाचा विचार करायला हवा आणि यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली अंगिकारणे हा एक उत्तम उपाय होय. आयुर्वेद शास्त्राचा नीट अभ्यास केला, त्यातील मूलगामी तत्त्वे समजून घेतली तर हे लक्षात येते की हे शास्त्र पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोचणार नाही यासाठी प्रत्येक ठिकाणी तत्पर असलेले दिसते. पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यावरणाचा योग्य वापर हे संतुलन आयुर्वेदशास्त्राने ज्या पद्धतीने सांभाळले आहे, त्याला तोड नाही. आयुर्वेदाने अग्नी, वायू, काळ यांना ‘भगवान’ म्हटलेले आहे, तर वनस्पतींना देवता म्हणून संबोधलेले आहे. पर्यावरणातील प्रत्येक जीवमात्राचे रक्षण करावे, शांतिपूर्ण व्यवहार असावा, शुद्धतेचे भान ठेवावे अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.  आयुर्वेदाची औषधे नैसर्गिक द्रव्यांपासून बनवलेली असल्याने ती तयार करतांना तसेच शरीरातून उत्सर्जित झाल्यानंतरही पर्यावरणाला घातक ठरत नाहीत, उलट यातून वृक्ष वनस्पतींचे संवर्धन होते, मनुष्य आणि निसर्गातील संबंध अधिकाधिक दृढ होत जातो. 

आरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वींच सांगून ठेवलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात मनुष्यमात्राच्या आरोग्याची तर काळजी घेतलेली आहेच, बरोबरीने प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत, ज्यांचा आजही उत्तम परिणाम होताना दिसतो. हत्ती, घोडे वगैरे प्राण्यांसाठी आयुर्वेदाच्या विशेष संहिता आजही उपलब्ध आहेत. वृक्षार्युर्वेदातल्या उपायांचा आजही उत्तम उपयोग होताना दिसतो. 

हवा शुद्ध होण्यासाठी प्राचीन काळी भैषज्ययज्ञ (औषधोपचार यज्ञ) केले जात असत. यामुळे ऋतुबदल होताना पर्यावरणात उत्पन्न होऊ शकणाऱ्या वैषम्याचे निराकरण होत असे, पर्यायाने ऋतुबदलामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध होत असे. हवा शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदाने घरोघरी धूप करण्यास सुचविले आहे. गुग्गुळ, धूप, चंदन, कडुनिंब, कापूर, वगैरे जंतुनाशक व सुगंधी द्रव्यांची किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर धुपा’ची धुरी विविध दृश्‍यादृश्‍य जंतूंचा नाश करण्यास समर्थ असते. तसेच अदृष्ट व वाईट शक्‍तिनाशासाठी ग्रहदोष परिहारक धूप करण्यास सुचविले आहे.

Similar questions