पृथ्वीवर हवेचा दाब कमी आहे
Answers
Answer:
४. हवेचा दाब
<b>थोडे<b> <b>आठवूया.<b>
सामान्य विज्ञान इयत्तासातवीच्यापाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ३ 'हवा या नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म' मधील पृष्ठ १६ वरील हवेला वजन असते, हा प्रयोग तुम्ही केला आहे.
<b>भौगोलिक<b> <b>स्पष्टीकरण<b>
या कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल, की, फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली. याचाच अर्थ असा होतो, की हवेला वजन असते.
ज्या वस्तूला वजन असते, तिचा खालील वस्तूंवर दाब पडतो. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यांसारख्या अनेक घडामोडी होतात. त्याची काही प्रमुख कारणे आहेत.
* हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो.
* हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो.
* प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण
हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात.