पृथ्वीवर सजीव् कसे निर्माण झाले
Answers
Answer:
सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रहाचं ताऱ्याभोवतीचं स्थान. ताऱ्यापासून ग्रह विशिष्ट अंतरावर असेल तर त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्यासारखं द्राव्य द्रव स्वरूपात आढळतं. पृथ्वी सूर्यापासून विशिष्ट अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवर पाणी तिन्ही म्हणजे घन, द्रव आणि वायू स्वरूपात आढळू शकतं. ताऱ्यापासून ज्या अंतरावर ग्रहाच्या पृष्ठभागावर एखादे द्राव्य दीर्घकाळापर्यंत राहू शकतं आणि ज्या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण होऊ शकते त्या अंतराला ‘हॅबिटेबल झोन’ असं म्हणतात. पृथ्वी सोडल्यास सूर्यमालेतला एकही ग्रह हॅबिटेबल झोन नाहीये.
दुसरा महत्त्वाचा घटक जो जीवसृष्टीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे तो म्हणजे पाणी. पाण्याला वैश्विक द्रावण- ‘युनिव्हर्सल सॉल्व्हन्ट’ असं म्हणतात. अनेक द्रव्यं पाण्यात सहज विरघळतात. पाणी हे एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण द्रव्य आहे. पाण्याचं विसंगत वर्तन, पाण्याची विशिष्ट उष्णता, क्षमता यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे सजीव निर्मितीसाठी हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली कारण पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात आहे. सजीव पाण्यातच निर्माण झाले आणि पृथ्वीच्या आणि सजीवांच्या ४०० कोटी वर्षांच्या अस्तित्वापकी जवळजवळ ३५० कोटी वर्षे सजीव केवळ पाण्यातच होते. पाण्यासारखे गुणधर्म असलेलं दुसरं कोणतंही द्रव्य आपल्याला माहीत नाहीये.