Hindi, asked by birhadekalpesh09, 8 days ago

पाठयपुस्तकातील वाकप्रचार लिहून, त्यांचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दहा)​

Answers

Answered by yashshingade25
4

1) नाव मिळवणे.

अर्थ :- कीर्ती मिळविणे.

वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम

येऊन सुप्रियाने नाव मिळविले.

2):-रक्ताचे पाणी करणे.

अर्थ :- खूप कष्ट करणे.

वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी

केले आणि स्वराज्याची स्थापना केली.

3):-सोंग काढणे.

अर्थ :- नक्कल करणे.

वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब

सोंग काढतो.

4):-रात्रीचा दिवस करणे.

अर्थ :- खूप कष्ट करणे.

वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले.

5):- भांबावून जाणे.

अर्थ :- गोंधळून जाणे.

वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात

आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो भांबावून गेला.

6):-डोक्यावर घेणे.

अर्थ :- अतिलाड करणे.

वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला

आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर

घेतले.

7:-आळा घालणे.

अर्थ :- बंदी आणणे.

वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा

देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.

8):-तीरासारखे धावणे.

अर्थ:- खूप वेगाने धावणे.

वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश

स्पर्धेत तीरासारखा धावतो.

9:-मर्जी राखणे.

अर्थ :- खूश ठेवणे.

वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी

जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.

10):-संगोपन करणे.

अर्थ :- पालनपोषण करणे.

वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने

तिचे संगोपन केले.

hope it is helpful

Similar questions