पाउस पडला नाही तर. निबंध in Marathi plzz.. its urgent ..
who give answer of this que l will he or her as a brainly
Answers
Answered by
2
वर्तमानपत्र वाचत असताना मला एक गोष्ट जाणवली कि प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येतात . त्या कशामुळे ? माझ्या वडिलांनी सांगितलं कि ते कर्ज फेडू शकत नाही . पण ते हे कर्ज का फेडू शकत नाहीत ? मी आईला विचारले तर ती म्हणाली कि पाउस न पडल्यामुळे पीक येत नाही मग धान्य बाजारात विकू शकत नाही ज्यामुळे रक्कम मिळत नाही आणि कर्ज ही भारता येत नाही . याचा अर्थ की पाउस माणसावर रुसला असेल . जर खरच पाउस रुसला तर ! पाउस पडला नाही तर आपण पिणार काय ? पाणी नसेल तर आपण स्वच्छ कसे होणार ? पाणी नसेल तर पशु - पक्षी जगणार कसे ? झाडांना पाणी नाही मिळालं तर ते फळ नाही देऊ शकणार मग आपण कोणाकडे आशेने पाहायचे ? तो पर्यंत माझ्या मनात एक विचार चमकला . पाण्याच्या जागी आपण पेप्सी , स्प्राईट , को -को कोला असे कॉल्ड ड्रिंक पीऊ शकतो . किती गंमत ना !पेप्सीची आंघोळ ! स्प्राईट चे पाणी ! स्वीमिंगपूल मध्ये पाण्या ऐवोजी को-को कोला ! खरच मजा येईल ना ! यातील विनोद सोडला तर पाण्याविना माणसाचे हाल -हाल होतील . संत तुकाराम महाराज म्हणतात : " वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे । " अर्थात वृक्ष आपले सखे आहेत . पण जर या वृक्षांना वाढवण्यासाठी पाणीच नसले तर काय करायचे ? मनुष्य जे आतापर्यंत सूर्याला प्रणाम करत आहेत ते भविष्यात जाऊन त्याला सुर्य नारायण म्हणणार का ? सूर्याच्या उष्णतेने जमीन तप्त होऊन पाण्याच्या थेंबासाठी आतूर असेल आणि जे काही थेंब तिला मिळणार ते म्हणजे लोकांचे अश्रुरूपी स्वेद असणार . पाण्याशिवाय सृष्टी अचल होणार . त्यावेळेस ," लोक पाण्यासाठी रडणार नाही , तर पेटणार !" पाण्यासाठी भिक मागावी लागेल . अश्रू येण्यासाठी देखील पाणी राहणार नाही . लोकांना नीट रडतही नाही येणार . अशा वेळी देवाशिवाय कोणी वाचवू शकणार नाही . पण त्यावेळी देवाकडे आशेने बघणार का ? त्याच्यावर विश्वास ठेवणार का ? देव त्यांना मदत करणार का ? भुकेने कण्हणारे लोक आत्महत्या हाच पर्याय तर नाही स्वीकारणार ना ? ही सृष्ठी कोरडी नाही राहणार ना ?तहानलेल्या माणसांवर निसर्ग दया करणार की नाही ? हा विचारच किती भयंकर आहे ना ! आपण तर एकदा आंघोळ नाही केली तरी किती बेचैन होतो . पण जर एकदा पाणीच मिळायचे बंद झाले तर ? आंघोळ लांब ची गोष्ट , पाण्याच्या थेंबासाठी तडपणार लोकं ! खरच पाणी माणसासाठी अमृत आहे . म्हणून माणसाने या अमृताचा उपयोग योग्यपणे करायला हवा . आज आपल्याला पाणी मिळत आहे हे निसर्गाचे वरदानच !
HOPE THIS HELPS YOU DEAR.......!!!!!!!
HOPE THIS HELPS YOU DEAR.......!!!!!!!
Similar questions