Hindi, asked by advaitmane1010, 1 month ago

पाऊस आणि तुम्ही त्यांच्यातले संवाद लेखन​

Answers

Answered by muskankhatun9825
0

Answer:

पाऊस: अग छत्री ताई कशी आहेस तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी

छत्री: पाऊस दादा तू आज काल जरा जास्तच जोमात भरतोय तुझी तब्येत फारच छान दिसतेय

पाऊस: तसं काही नाही ग पाणी बरसवणे हे माझे कर्तव्यच आहे मी जोमाने बरसणार तरच ही सजीवसृष्टी सुरळीत चालणार ना.

छत्री:हो अगदी बरोबरच आहे.

पाऊस :पण मला कधीकधी भीती वाटते मी मी जेव्हा टपोऱ्या थेंबांचा वर्षाव करतो तेव्हा तुला काही इजा तर होत नाही ना.

छत्री:नाही रे दादा उलटे मला तर पावसाळ्याच्या पाण्यात भिजणे फार आवडते. मग तो टपोऱ्या थेंबाचा असो वा हलक्‍या सरी.

पाऊस:बरं मला छान वाटलं तुला भिजायला आवडते हे ऐकुन, छत्री ताई एक सांगू काय तुला

छत्री :सांग ना रे पाऊ स दादा

पाऊस तू माणसाच्या संरक्षणासाठी तुझं कर्तव्य मोठ्या नेमाने पार पडते त्याचा मला फार अभिमान वाटतो.

छत्री: धन्यवाद तू जसं तुझं कर्तव्य पार पाडतो तसं मी सुद्धा माझं कर्तव्य पूर्ण करते त्यात अभिमान कसला.

पाऊस :पण कधी कधी माणूस तुझी हेळसांड करतो तुझी योग्य काळजी करत नाही तेव्हा मला फार वाईट वाटते ग

छत्री:हो ना या गोष्टीच मलाही वाईट वाटतं तू जेव्हा जेव्हा येतो तेव्हा माणसाला माझी गरज वाटते नंतर माझ्या कडे कोणी लक्षही देत नाही.

पाऊस: हो खरंच आहे, मी नसताना तुझे हाल होतात हे मी सुद्धा आकाश दादा कडून ऐकलंय

छत्री:जाऊदे रे दादा माणसाच्या स्वभावातच आहे ते. ते म्हणतात ना कामापुरता मामा

(हे ऐकून दोघेही हसायला लागले)

Explanation:

hope it helps

Similar questions