पाऊस निबंध लेखन मराठी
Answers
पावसाळ्यात पाऊस पडतो. पाऊस हा खूप महत्त्वाचा असतो. पाऊस पडल्यामुळे आपल्याला पाणी मिळते . पावसामुळे डोंगरात गवत येते. पावसाळ्यात खूप पाणी असते. पावसाळा खूप निसर्गरम्य असतो.कधीकधी पाऊस जास्त पडतो तर कधीकधी पाऊस कमी पडतो. पाऊस जास्त पडला तर खूप व नुकसान होते. पाऊस पडल्यामुळे पिके छान येतात. पावसाला समानार्थी शब्द वर्षा आहे.
पाऊस सुरू झाला की सर्वत्र विशिष्ट प्रकारचे चैतन्य पसरते. त्या चैतन्याने सर्व सजीवसृष्टी न्हाऊन निघते. उन्हाळा सहन केल्यानंतर पृथ्वी ओलाव्यासाठी आसुसलेली असते. त्याचीच परिणीती म्हणून पाऊस सुरू होतो आणि सर्व निसर्ग आणि सजीव सृष्टी सुखावते.
पाऊसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्ण पृथ्वीवर पाण्यामुळेच जीवन आहे त्यामुळे पाण्याला पंचतत्वांपैकी सर्वात महत्त्वाचे समजले जाते. पृथ्वीवरील पाणीच पुन्हा प्रत्येक वर्षी पाऊसाच्या रूपाने ताजेतवाने होऊन परत पडत असते.
पाण्याने झाडे, प्राणी, पक्षी आणि मानव देखील आनंदीत होत असतो. भारतात तर पाऊसाला देवकृपा समजली जाते. संपूर्ण देशात शेती केली जात असल्याने शेतीसाठी पाऊसाचे पाणी किती आवश्यक आहे, हे इथला प्रत्येक नागरिक जाणतो.
पाऊसाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणून तसेच जलसंवर्धन करून माणूस वर्षभर खाण्यासाठी धान्य पिकवत असतो. त्याशिवाय वनराई, जंगले, झाडे झुडुपे यांसाठी पाऊस हा वरदानच ठरतो. त्यांची वाढ पावसाळ्यात उत्तम प्रकारे होत असते.
पाऊसाचे पाणी हे नद्या, सरोवरे आणि तलावात साठत असते. नद्यांमार्फत ते पाणी समुद्राला जाऊन मिळत असते. त्या नद्यांतील आणि इतर जे स्त्रोत आहेत त्यामधील पाणी माणूस दैनंदिन जीवन आणि शेतीसाठी वापरतो.
पाऊसामुळेच जलचक्र शक्य आहे. त्या जलचक्रामुळे पृथ्वीवर प्रत्येक वर्षी पाऊस पडतो. त्यानुसार पृथ्वीचे तापमान आणि वातावरण व्यवस्थित ठेवले जाते. परंतु वृक्षतोड, वन्यजीवन विस्कळीत होणे आणि प्रदूषण यामुळे कधीकधी आपल्याला अवकाळी पाऊस आणि प्रचंड पर्जन्यवृष्टी पाहायला मिळते.
प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की शाळा सुरू होत असते त्यामुळे पावसाळ्यातील एक वेगळीच अनुभूती शाळेत शिकताना येत असते. शाळा सुरू झाली की दप्तर आठवत नाही पण छत्री आणि रेनकोट मात्र आठवतो. त्यातच पाऊसावर कविता आणि गोष्टी ऐकल्याने तर पाऊस आणखीनच आवडू लागतो.
चित्रपट, मालिका यांमधून काही वेळा पाऊसाचे चित्रण दाखवले जाते. त्यातून आपल्याला स्वतःचा पाऊसाबद्दलचा अनुभव आठवतो. वास्तविक पाहता सकाळ किंवा सायंकाळचा पाऊस अनुभवताना गरमागरम चहा आणि नाश्ता असेल तर पाऊसाची अनुभूतीच निराळी!