पाऊस नाही पडला तर... काय होईल तुमचे मत माडा
Answers
Answer:
is ka kya mtlb hota hai??
Answer:
पाऊस पडला नाही तर लोकांना पावसाच्या पाण्याने त्रास होणार नाही, पाणी साचून कोणाचेही काही नुकसान होणार नाही आणि लोक आनंदाने राहतील. पण नंतर माझ्या मनात दुसरा विचार आला.
पाऊस नसेल तर आपल्याला पाणी कसे मिळेल.जर पाऊस पडला नाही तर तळे आणि नद्या राहणारच नाही. पावसाचे पाणी नाही तर नद्या आणि तलावांमध्ये राहणारे जीव जगू शकणार नाही.
आपल्या आजूबाजूला सुंदर हिरवेगार निसर्ग आपण बघतो, पण जर पाऊस नसला तर झाडे जी आपल्याला हवा, खायला फळ आणि सावली देतात ते राहणारच नाही. पावसाच्या पाण्याविना सर्व झाडे सुकून जातील आणि सर्व झाडे मरून जातील. जे सुंदर निसर्ग आपण बघतो ते केवळ एक वाळवंट स्वरूप दगड धोंड्यांचे प्रदेश बनून जाईल.
आपल्याला पाऊस पडला नाही तर पावसाने मातीला येणारा सुगंध मिळणार नाही, पहिल्या पावसात भिजण्याची मजा घेता येणार नाही, इंद्रधनुष्य बघायला मिळणार नाही. पावसाळा आला नाही तर पावसात होणाऱ्या छत्रीचा कावळा बघता येणार नाही.
जर पाऊस पडला नाही तर आपल्याला खायला काहीही मिळणार नाही कारण पावसा विना शेती शक्य नाही. जर का पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर जीवन शक्य नाही कारण आपल्यांना प्यायला पाणीसुद्धा मिळणार नाही.
पाऊस पडल्याने नुकसान होते हे खरे आहे पण त्यामध्ये आपली सुद्धा चूक आहे कारण सगळीकडे सिमेंटीकरण केल्याने जमिनीला पाणी शोषता येत नाही. आणि शहरांमध्ये पावसाच्या पाण्याला नीट वाहता येत नाही आणि म्हणून पावसामुळे आपले नुकसान होते. पाऊस आहे तर जीवन आहे, म्हणून पाऊस हा पडलाच पाहिजे.
समाप्त.