पाऊस पडलाच नाही तर काय काय होईल?
tell me fast plz
Answers
Answered by
1
आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये पाण्याचे सर्वत मोठे स्थान आहे. कारण कोणताही सजीव म्हणजेच मानव असू दे किंवा पक्षी – प्राणी असू दे. कोणीही सजीव या पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. मानव एक वेळ अन्नाशिवाय जगू शकतो.परंतु पाण्याशिवाय एक दिवस सुद्धा जगू शकत नाही. मानवी जीवन हे संपूर्णपणे पाण्यावरच अवलंबून आहे. म्हणून पाणी हेच जीवन आहे असे म्हटले आहे. म्हणून पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी व धरतीवरील पाणी साठवून ठेवण्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे.या पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे – पाऊस होय. जर एकदा असे झाले की, सर्व सजीव सृष्टीला आवश्यक असणारा हा पाऊस पडलाच नाही तर ? जर हा पाऊस पडलाच नाही तर मानव आणि इतर सजीवांचे जीवन कोलमडून जाईल.
Similar questions