पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा
पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात.
Answers
Answer:
पावसाला साद घालून अवघा महाराष्ट्र थकला पण अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही. हवामान खात्याने वेगवेगळे अंदाज व्यक्त करून झाले, पण जमिनीची तहान भागवेल असा सलग पाऊस अद्याप झालेला नाही. स्वाभाविकपणे सदासर्वकाळ जिवंत असणाऱ्या सोशल मीडियातून हवामान खात्याच्या ‘वेध’ घेणे सुरू आहे. पावसाळी पर्यटन, कांदी भजी आणि गरम चहा यांच्याइतकीच हवामान खात्यानेही आपल्या पावसाळी आठवणींमध्ये जागा व्यापली आहे.
विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसे आपले विज्ञानावरील अवलंबित्वदेखील वाढले. हवामान खात्याच्या अंदाजाकडे डोळे लावून बसण्याची सवय आता आपल्या अंगवळणी पडली आहे. पण, हे खाते अस्तित्वात येण्यापूर्वीही पावसाचा अंदाज घेतला जात होता, त्याबरहुकूम शेती केली जात होती आणि दैनंदिन जीवनातील विविध गोष्टीही घडत होत्या. निसर्गाशी तादात्म्य होते तोपर्यंत निसर्गातील बदल माणूस सहज टिपायचा आणि त्यानुसार नियोजनही करायचा. विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी पावसाचा थेट संबंध असल्याने त्यांच्याकडे पावसाबाबतचे हे ज्ञान निश्चितपणे होते. मात्र, मागील काही पिढ्यांमध्ये पावसाच्या आगमनाचे शेतकऱ्यांकडील पारंपारिक ज्ञान लुप्त होत गेले आहे.
काही वर्षांपूर्वी मध्य भारतातील एका शेतात वयस्क शेतकऱ्याशी अन् त्याच्या दोन तरुण मुलांशी त्यांच्या शेतात उभे राहून बोलत होतो. पेरणी करण्याचा निर्णय कसा घेता, कशाच्या आधारे पेरणी करता, पावसाचा अंदाज कसा बांधता वगैरे प्रश्न त्यांना विचारले जात होते. ‘पाऊस कधी येतो... ७ जूनला, ढग येण्याची दिशा कोणती...मुंबईकडची’ असली उत्तरे ऐकायला मिळाली होती. या सगळ्या उत्तरांतून एकच कळत होते की या शेतकऱ्यांची पावसाबाबत स्वतःची काहीही निरीक्षणे नाहीत. ७ जून वगैरे सगळी छापील माहिती ऐकतच ते मोठे झाले. त्यांच्या आधीच्या पिढ्यांकडे पावसाबद्दलचे निरीक्षणातून आलेले परंपरागत ज्ञान होते. निसर्गाच्या निरीक्षणातून आलेल्या या माहितीच्या आधारे ते पावसाच्या आगमनाचे आडाखे बांधत. पण, हे ज्ञान पुढील पिढ्यांकडे संक्रमित झाले नाही आणि अवघ्या दोन पिढ्यांमध्ये ते अस्तंगत झालेय की काय, असे वाटायला लागले आहे. केवळ मध्य भारतातच नव्हे तर शेती करणाऱ्या मोठ्या भारतीय भूप्रदेशात कमी-अधिक फरकाने ही परिस्थिती आहे.
जेव्हा पावसाच्या आगमनाचे किंवा त्याच्या प्रमाणाचे अंदाज व्यक्त केले जात असत, त्याचा आधार हा निसर्गातील पारंपारिक निरीक्षण हाच होता. आता, या निरीक्षणांना संख्याशास्त्राचा किंवा शास्त्रीय विश्लेषणाचा आधार नव्हता म्हणून रद्दबातल करता येईलही. तसा आधार आज दिला जाऊ शकत नाही, हेही खरे आहे. मात्र, ही निरीक्षणे होती आणि भारतीय मानवी लोकजीवनात त्यांना स्थान होते, हेदेखील नाकारता येणार नाही. सुगरणीच्या खोप्याची उंची किती यावरून पावसाचा अंदाज बांधण्याचे उदाहरण आपणा सर्वांना ठाऊक आहे. या व्यतिरिक्त, टिटवी पाण्यापासून किती अंतरावर अंडी देते, आपल्या पिलांना जन्म देण्यासाठी मगरीने पाण्यापासून किती दूरची जागा निवडली आहे असे पावसाच्या प्रमाणाचे ठोकताळे याच भारतात वर्षानुवर्षे विविध भागांत लोकश्रुत होते किंवा आहेत.