पावसाच्या पाण्याच्या जलव्यवस्थापनाचे फायदे लिहा.
Answers
Answer:
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेच पाणी वाहून वाया जाते. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात तर पाण्याचा हा अपव्यय होय. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी जिरवणे व ‘पाणी साठवणे’ या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा जमिनीत जिरविलेल्या पाण्याचा फायदा असा की, भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यामुळे त्यात घट होत नाही.जल व्यवस्थापन म्हणजे केवळ धरणे बांधून पाइपलाइन्स शहरांपर्यंत नेणे व पाण्याचा फ्लश सोडून घरातील घाण बाहेर घालवणे एवढा मर्यादित अर्थ नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत पटवून देणे होय, त्यासाठी पाण्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करण्याचा शहाणपणा आपल्या अंगी आला पाहिजे. अन्यथा सर्वाना पुरवता येईल एवढे पाणीच राहणार नाही.भारताच्या उष्ण वाळवंटात, कुंडी हे अतिशय साधे साठवण-तंत्रज्ञान वापरून जलव्यवस्थापनाचा मोठा परिणाम साधला आहे. कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या जमिनीच्या तुकडय़ावर तेथे पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे. हे पाणी मग उतारावरून विहिरीत जाऊन साठेल अशी व्यवस्था केली आहे. जर पाऊस एकंदर १०० मि.मी पडला आणि ते सर्व पाणी साठवले तर एक हेक्टर जमिनीवर १० लाख लिटर पाणी साठवता येते. देशात काही ठिकाणी पुराच्या पाण्याचे संधारण करण्यात आले आहे. एका ढगफुटीतही एवढा पाऊस पडू
शकतो हेही लोकांना माहीत आहे. पावसाचे पाणी साठवून ते उर्वरित वर्षभर भूजल साठय़ात पाणी मुरवणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी जेव्हा व जिथे पडेल तिथे साठवणे. जमिनीवर किंवा जमिनीच्या खाली ते साठेल अशा रीतीने व्यवस्था करणे गरजेचे आहे. आज आपली शहरे खूप लांबून पाणी मिळवतात. शहरी-औद्योगिक पट्टय़ातच पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्यांनी त्यांची जलसाधने वाढवण्याकडे दुर्लक्ष केले. पाणी साठवण्याचे व त्याचा कमी वापर करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. जलप्रक्रिया प्रकल्पांअभावी पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागात भूजल पातळी घटत आहे, कारण बोअरच्या विहिरी खोदण्याचे प्रमाण वाढत आहे. नगरपालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाहीत त्यामुळे बोअर विहिरी खोदल्या जातात व भूजलाचा उपसा केला जातो त्यामुळे त्याची पातळी कमी झाली आहे, अशा प्रकारे पाण्याची टंचाई वाढतेच आहे. पण खरी शोकांतिका वेगळीच आहे; ती म्हणजे जेव्हा पाऊस पडत नाही, तेव्हा शहरातील लोक गळा काढतात. भारतात आधुनिक काळात शहरांना पावसाच्या पाण्याचे महत्त्व समजून देण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे पर्जन्य जलसंधारण प्रत्येक घरात व वसाहतीत तर झालेच पाहिजे. परंतु आता पुन्हा शहरांनजीक तरी जलटाक्या तळी बांधणे गरजेचे आहे. जवळपास प्रत्येक शहरात अशा टाक्या होत्या, ज्या पूरस्थितीत पाणी साठवून भूजलाचे पुनर्भरण करीत असत पण शहर नियोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पाणी साठवण्यासाठी जमीन राखून ठेवली नाही. आज या टाक्यांच्या रूपातील जलसाठे अतिक्रमित आहेत, काहींची गटारे बनली आहेत, काहींमध्ये कचरा भरला आहे, काहींमध्ये पाणी भरले पण ते निष्काळजीपणाने वाहून जात आहे अशी दयनीय अवस्था आहे. तसेच बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांना पाणी साठवण्याचे, जलसंधारणाचे प्रशिक्षण दिले जात नाही.
Explanation:
mark as brilliant and like this ans
Answer:
पावसाचे पाणी जमा करणे आणि त्याचा नंतर योग्य वेळी वापरासाठी साठा करणे अशी पावसाच्या पाण्याच्या साठवणीची (RainwaterHarvesting) व्याख्या करता येईल. सोप्या शब्दांत, पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी जमा करणे, साठवणे, आणि त्याचे शुद्धीकरण करून ते वापरणे.
Explanation:
पावसाच्या पाण्याच्या साठवणीचे फायदे:
भू-जल आणि नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा ह्यांना पूरक ठरू शकते. पाण्याचा इतर पुरवठा नसेल अशा ठिकाणीही बांधकाम किंवा शेती करता येऊ शकते. पूर आणि जमिनीचा वरचा स्तर वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.भू-जल आणि नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा ह्यांना पूरक ठरू शकते. पाण्याचा इतर पुरवठा नसेल अशा ठिकाणीही बांधकाम किंवा शेती करता येऊ शकते.उच्च दर्जाचे पाणी – शुद्ध, रासायनिक द्रव्यांशिवाय,पाणी पुरवठ्याचा खर्च अगदी कमी पूर आणि जमिनीचा वरचा स्तर वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.