World Languages, asked by aspatil2703, 7 months ago

पावसाल्यातील एक दिवस kisike pass composition book hai to photo click kar ke bhejo​

Answers

Answered by madhukargarje
3

Answer:

दरवर्षीचा पाऊस आपल्यासोबत काहीतरी नविन घेऊन येतो . ह्या वर्षी ही असच कहिस होते वळवाचा पाऊस हा आला नाहीच आणि पाऊस आला तो आपल्या सोबत एक वादळ घेऊनच जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरु झालेला पाऊस सर्वाना हादरुन टाकणारा होता.... सतत आठ दिवस कोसळणारा पाऊस बरेच काही सांगत होता। आठवणीच्या गाठोडयातुन एक एक आठवण सरीं सोबत मनात घर करत होती .. पाऊसामुळे समोरचा डोंगर हिरवी शाल पांघरून पाऊसाची मजा लूटत होता पण मन मात्र त्या सरींसोबत पडून वाहत जात राहिले … नवीनहुन कळलेली प्रत्येक गोष्ट आणि आजवर जगलेल्या क्षणांचा मेळ पावसासोबत घालत राहिली जणु हा पाऊस आपल्या पुरातल्या पाण्यासोबत सारच घेऊन जायला आला होता। इकडे मनातल्या पुरात आठवणी वाहून चालल्या होत्या तर तिकडे देशात ''चारधाम " यात्रेत गेलेले भाविक जीव मुठीत घेऊन पूराच्या पाण्यात वाहत होते . ह्या वर्षी कधी नव्हे ते 'गंगेने ' सुद्धा रूद्र अवतार धारण केला होता हा पाऊस काहीसा वेगळाच होता पण त्यालासुद्धा कुठेतरी विश्रांति हवीच होती , मुसळधार पडणारा पाऊस आज खुप दिवसांनी थांबला होता रात्रभर शांत राहून आज पावसाने उसंत घेतली होती। .

आज बरेच दिवसांनी झालेले ' सूर्यदर्शन ' मनाला आनंद देणारे होते। वाटले जणु पावसामुळे नभावर आलेले मळभ दूर होऊन नविन आशा घेऊन सूर्य पृथ्वीवर आपल्या किरणांनी आनंद देऊ पाहतोय।

मनातील विचार सत्यात उतरावे तशी t.v. वरची बातमी सांगून गेली ''यात्रेत अडकलेल्या भविकांच्या सुटकेचे प्रयत्न चालू झालेत। आणि पुन्हा एकदा सूर्य दर्शनाने दिवसाची सुरवात करायचे ठरवले परन्तु त्या सूर्यनारायणाच्या मनातही काहीसे वेगळेच दिसले त्या मनमोहक सूर्यदर्शनाची आठवण झाली आणि मन तेथेच आठवणीत रमले , हसता खेळता हे दिवसही बरेच लवकर निघून गेले परन्तु जाताना जणू आठवणींचे गाठोड़े मागे ठेवले एक एक आठवण हळुवार काढावी , जगावी आणि मग तितक्याच हळुवार पणे पुन्हा ठेवून द्यावी मागे वळून पाहावे तर वर्ष कशी फुलपाखरासारखी उडून गेली , काल आणि आज मधे किती फरक होता शिवाय उद्या काही वेगळाच असेल काय असेल कुणास ठाऊक। ... कोणीतरी म्हंटलेय ना ''कहिहि झाले तरी आयुष्य थांबत नाही आणि आपल्या आयुष्यात काही होते ते चांगल्यासाठी आणि जे जे होईल ते ते पहावे अन चित्ती असू द्यावे समाधान .. सारे काही कळत असले तरी वळत मात्र काहीच नाही मनाने जणू स्वतःचे खेळ मांडले होते

खेळावरून आठवले लहानपणीचे दिवस किती गोड होते ना, ती शाळा , ती सुट्टी आणि त्या सुट्टीतील धमाल मस्ती !!, दिवसभर नुसता खेळ , सकाळ , संध्याकाळ घराबाहेर आणि दुपारी घरातील खेळ, त्यातील सर्वांचा आठवता म्हणजे ''पत्यांचा डाव " आपले आयुष्य म्हणजे सुद्धा ह्या पत्यांच्या डावासारखे असावे बहुदा पहा ना, आपण पत्ते खेळतो , त्याची सुरवात होते ती पान वाटण्यापासून मग तो सात आठ असो वा बदाम सात आपण पान पिसतो , आणि प्रत्येकाला टी वाटतो , जो वर जमिनीवर असतात , तोवर आपल्याला माहित नसते टी पान काय आहेत आणि मग जेव्हा एक एक पान उचलत जातो आणि आपल्याला आयुष्याच् चित्र सष्ट होत जाते की खेळ काय आहे ? आणि आपण जिंकणार की हारणार ??

"प्रत्येक नवा दिवस म्हणजे हातात आलेले नव पान !

ते जो वर जमिनीवर आहे तोवर माहित नाही , पण हातात आल्यावर कळत , दुरी -तिरी आहे.

की हुकुमाचा एक्का !!!"

पण माला तू नकोस , म्हणून नकारता येत नाही ,

दिवस जस आला तसा जगावा लागतो जेव्हा जगुन तो पूर्ण होतो तेव्हाच कळते की तो आपण कसा जगलो , पण तो कसाही असला तरी स्वीकारलायला लागतो। .मला तू नकोस म्हणून डाव फ़ोड़ता येत नाही , कारण लहानपणीच्या खेळातून आपण बरेच मोठे झालेले असतो ते पत्ते म्हणजे जणूआपले नशीबच असत !!जस जे वाट्याला येईल ते स्वीकारायचे , मग पत्ते कुठलेही असोत , तरी डाव मोडायचा नाही , खेळायच. लढायच शेवटच्या पानापर्येत जीव ओतायचा आणि जिंकण्याची शर्थ करायची , कदाचित हरणही असेल नशिबात पण प्रत्येक वेळी आपण डाव नाही हारणार , कधीतरी आपल्या हातात चांगले पान येणारच कधीतरी आपल्या हातातील '' हुकुमाचा एक्का " आपलांच असेल , आणि डाव पलटेल सोबतच्या एक्का सोबत डाव जिंकू आपण।

आठवणीच्या सरींमद्धे दुपार कशी गेली समजेलेच नाही आणि पत्त्याचा खेळही संपला , खिडकीतून बाहेर पाहिले तर खिडकीवर काळे ढग जमा झाले होते , पुन्हा पाऊस भरून आला होता पुन्हा आकाशात मळभ आले होते प्रश्न फक्त इतकाच होता की ह्या वातावरणात पुन्हा मनावर मळभ येऊन आठवणी वाहु लागतील की नविन येणाऱ्या पावसात सार नविन असेल, हे सार मात्र येणारा काळच ठरवणार होता वाळवंटात भटकण्याऱ्या हरणाला खरच जल लाभणार आहे की असेल ते फक्त " मृगजळ "

" मुसळधार पावसासोबत हा पावसाळा संपणार होता की काय कोण जाणे , पण वेड्या मनाला वेध लागले होते ते "गुलाबी थंडीचे " आठवणीतील एक सुरेख पान। स्वप्न , सत्य की कल्पना हे अजुन नक्की नव्हते हे सारे काळाच्या स्वाधीन होते तोपर्यंतचा काळ म्हणजे जणू परीक्षा आधीचा काळ होता भीति फक्त परीक्षेची नव्हती तर पेपर आधीच अभ्यासक्रम बदलला तर ,,, असो हे सारे त्याच्या हातात होते आपण फक्त ह्या रंगमचावरचे कट्पुतले आहोत ह्याचा प्रत्यय आला होता

खिडकीतून पावसाचे पाणी बरेच घरात येऊ लागले होते मागून आईची हाक आली आणि खिड़की बंद केली वाटले तय खिड़की सोबत मनाची दारे सुद्धा बंद करावीत पण टी तशीच राहिली , पाऊस सुरु झाला होता सोबत आठवणीही ,,,मातीचा सुगंध घेऊन जमिनीवरून वाहत होत्या। . रात्र कढ़ी झाली कळलेच नाही , आजचा दिवस संपला होता आता प्रतीक्षा होती ती उद्याच्या सूर्योदयाची , नविन दिवसाची।

Similar questions