India Languages, asked by siddhisethia15, 4 months ago

पावसाळा information Marathi​

Answers

Answered by acharyahoney73
2

Answer:

HOPE IT HELP'S YOU.

पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो, पावसा मुळे निसर्गात खुपसारे बदल होतात तसेच आम्ही ह्या पावसात खूप मज्या करतो. तर मित्रांनो आज आम्ही पावसाळा ह्या वर आपल्या साठी पावसाळा हा मराठी निबंध लिहिला आहे, तो आपल्यांना नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या.

Explanation:

पाऊस सुरु होण्या आधी, उन्हाळ्याच्या गर्मी ने संपूर्ण जमीन तापलेली असते. लोग गर्मीत येणाऱ्या घामा ने अस्वस्थ झालेली असतात, आणि ते ढगांन कडे पाहू लागतात सगळ्यांचा मनात एकच इच्छा असते, ती म्हणझे कधी हा पावसाला सुरु होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो.

आणि मग रिमझिम पावसाळा सुरवात होते, आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि गान म्हणतो " ये रे ये ये पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस अल्ला मोटा" पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो मला खूप आवडतो.

पाऊस पडल्याने सर्वी झाडे हिरवीगार होतात आणि गर्मी ने तापलेल्या वातावरणात गारवा येतो. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आटलेले नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात. शेतांच्या कामाला सुरवात होते, पावसानमुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्या मध्ये शेता मदे पिक डोलू लागते.

पावसात शाळेत जाण्याची मज्या काही वेगळीच असते, मला शाळेत जाण्यासाठी साठी पप्पा नवीन रेनकोट घेऊन देतात. मला पावसात जायला आवडते आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो कागदाच्या होड्या बनून वाहत्या पाण्यात सोडतो पण केलेली मज्या घरी आल्यावर आईचा रागाने संपते, कपडे घाण झाल्याने आई खूप रागावते.

पाऊस कधी इतका पडतो कि सगळी कडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो तो खूप छान दिसतो. सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. मी कधी बगीतला नाही पण आई सागते कि पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो मला तो नाच नक्की बगायला आवडेल.

पावसात आम्हाला शाळेला सुट्टी मिळते, गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

Similar questions