पावसाळा तिला एक दिवस निबंध
Answers
तसे तर जुन च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाळ्याची चाहूल लागणे सुरु होऊन जाते. जिकडे तिकडे निसर्ग पावसाळ्यासाठी वाट निर्माण करत असते. खूप हवेचे आणि वाऱ्याचे वातावरण निर्माण होते. असेच जुनच्या शेवटच्या आठवड्यात एके दिवशी मी दुपारच्यानंतर काही कामानिशी घराबाहेर पडलो. वातावरण तसे साफच होते. आभाळ हि स्वच्छ होते, वातावरण ढगाळलेला नाही, पाऊस होणार असे काही संकेत नाही म्हणून मी रेनकोट वैगेरे काही आपल्यासोबत धरलो नाही. जायचे थोडे दूरच होते. सोबतीला माझी passion pro हि दुचाकी गाडी होती.
मला घर सोडून जेमतेम एक तास झाला असेल, मी जवळजवळ ४० की.मी. चा अंतर कापला असेल कि, काळ्या काळ्या ढगांनी आकाशात जमण्याला सुरुवात केली. आणि काही क्षणातच पावसाला सुरुवात झाली. रस्त्यात आसव्यासाठी एखादे घर किंवा क्षुल्लक झोपडीहि नव्हती. आणि समोर काही अंतरापर्यंत त्याची शक्यता हि नव्हती. खूप दिवासत पावसात ओले होण्याचा आनंद मनात गुदगुल्या करत होता. आणि एकीकडे आपल्याला अजून खूप दूर जायचे आहे, आपल्याकडे दुसरे कपडे नाहीत, ह्याची काळजी मनात लागलेली होती. थोड्यावेळ एका झाडा खाली आसरा घेण्याचा प्रयत्न केलो. थोड्या वेळ आपण आता सुरक्षित झालो असे वाटले. पण काही क्षणातच पाण्याचे थेम्ब खांद्यावर टपकायला लागले, थोडा बाजू झालो. ते काय आता थेंब डोक्यावर पडायला लागले. क्षणातच पावसाचे थेंब पूर्ण झाडांमधून अंगावर पडायला लागले. आता आपली पावसापासून सुटका होणार नव्हती. पुन्हा गाडी चालू केली. आणि पावसाचा आनंद घेत आपल्या गंतव्याकडे निघालो. तो पावसाचा दिवस मला आजही मनात गुदगुल्या करून देतो.