पावसाळ्यातील एक दिवस या विषयावर निबंध तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answer:
पावसाळा या विषयावरील सविस्तर निबंध वाचण्यासाठी कृपया आमच्या website वर visit करा.
www.sopenibandh.com
Answer:
पावसाळ्यातील एक दिवस :-मला रिमझिम पाऊस आवडतो. पण पाऊस अत्यंत लहरी आहे. तो कधी उग्र रूप धारण करतो. पावसाळ्यात असा एक दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे.
एके दिवशी पहाटे मला जाग आली. पावसाच्या आवाजाने ! बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. खिडकीतून फक्त पावसाच्या धारा दिसत होत्या. मी बाहेर डोकावतो, तर रस्ते पाण्याने भरून गेले होते. अवतीभवती मुसळधार पावसाचे जणू तांडवनृत्य चालले होते.
तो मुसळधार पाऊस पाहून आई म्हणाली, " आकाश, तुला शाळेत जाऊ नकोस." त्या कोसळणार्या पावसाकडे पाहून आई-बाबांनाही ऑफिसला दांडी मारण्याचा बेत जाहीर केला. त्यामुळे पावसाळ्यातील तो दिवस अचानक आमच्या सुट्टीचा दिवस ठरला.
रात्री सुरू झालेला तो पाऊस मात्र अद्याप एक कंटाळलेला नव्हता. सारे रस्ते जलमय झाले होते. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे रेल्वे गाड्या बंद पडल्याची बातमी टीव्हीवर दिसली. रस्त्याच्या गाड्याही मुंगीच्या वेगाने जात होत्या. पाऊस थांबतच नव्हता. त्यामुळे रस्त्यावर ती पाण्याची पातळी वाढत होती.
सहाजिकच त्या दिवशी सर्वांना घरात राहावे लागले. आईने जेवणाचा मस्त बेत केला. टीव्ही पाहत, मोबाईलवर गेम खेळत आणि भरपूर गप्पा मारत आम्ही तो दिवस घरातच घालवला. दुसर्या दिवशी जाग आली, तेव्हा तो खट्याळ पाऊस गडप झाला होता आणि लखलखीत ऊन पडले होते
Explanation:
bro can you please like and subscribe my all the videos plz