India Languages, asked by tanvimhatre878, 1 month ago

पावसाळ्यातील साथीचे रोग व निरोगी शरीर निबंध​

Answers

Answered by lohitjinaga
1

Answer:

एकाच गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साथीचे रोग बहुधा त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात. किंवा आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या दुसरी व्यक्तीला आणि तिच्याकडून इतरांना आजार संभवतो. अशाप्रकारे आजाराचे रुग्ण वाढत जातात..

सामान्यपणे होणाऱ्या अशा साथीच्या आजारांची ही जंत्री :

इन्फ्ल्युएन्झा

कांजिण्या

चिकुनगुनिया

टायफॉईड

डांग्या खोकला

डेंग्यू (डेंगी)

देवी : डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी इ.स. १७९६मध्ये देवीवरील लस शोधली. नंतर जगभर लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पुण्यामध्ये १८०४मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी स्वत:ला आणि कुटुंबीयांना एका इंग्रज डॉक्‍टरकडून लस टोचवून घेतली होती. सुमारे पावणेदोनशे वर्षांमध्ये भारतीयांनी सातत्याने केलेल्या प्रयत्‍नांनांमुळे देवी रोगाचे उच्चाटन झाले. १७ मे १९७५ रोजी भारतात देवी झालेला अखेरचा रुग्ण होता. १९७७मध्ये या रोगाचे पृथ्वीवरून उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.

धनुर्वात

नारू : दूषित पाणी पिण्याने होणारा हा रोग आता भारतातून हद्दपार झाला आहे. २००१ सालानंतर भारतात नारूचा रोगी सापडलेला नाही.

मलेरिया

पटकी (कॉलरा)

पोलिओ : इ.स. २००९पर्यंत जगात सर्वांत जास्त पोलिओग्रस्त रुग्ण भारतात होते. रुग्णांच्या लाळ-विष्ठा-शिंकेमार्फत पोलिओचे विषाणू हवा-अन्न-पाण्यातून सर्वत्र पसरतात. निदानासाठी या रोगाची निश्‍चित लक्षणे दिसत नाहीत. हा रोग बरा करण्यासाठी हमखास औषध नाही. हे लक्षात घेऊन भारतातील डॉक्‍टर, तसेच वैद्यकक्षेत्रात सतत कार्यरत असणारे ’पॅरामेडिकल‘ कर्मचारी, सामाजिक संस्था, राजकीय इच्छाशक्ती व वीस लाख स्वयंसेवक यांनी मोठ्या हिकमतीने भारत पोलिओमुक्त करण्यासाठी चंग बांधला. त्यांना यश मिळाले. पोलिओची एकही ’केस‘ १३ जानेवारी २०११ नंतर भारतात आढळलेली नाही. नंतरच्या तीन वर्षांत कुणालाही पोलिओ झाला नाही. साहजिक जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ रोजी भारत पोलिओमुक्त असल्याचे जाहीर केले.

प्लेग

महारोग (कु्ष्ठरोग)

क्षय

(अपूर्ण)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्लेगच्या साथीं’चा रोचक आढावा : . जगाच्या इतिहासातील कमी काळात सर्वाधिक बळी घेणाऱ्या तीन प्रमुख महामारी. त्या एकाच जीवाणूमुळे (बॅक्टेरिया) उद्भवल्या. हा जीवाणू म्हणजे, ‘येरसिनिया पेस्टिस’. त्याच्यामुळे घडलेली भयंकर महामारी म्हणजे ‘प्लेगची साथ’. प्लेगच्या साथींनी संपूर्ण जगाला कवेत घेतले. तसा प्लेग अनेकदा उद्भवला, त्याने लाखोंचे बळीसुद्धा घेतले. पण जगाचा इतिहास आणि चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदलून टाकणाऱ्या खालील या तीन प्रमुख साथी. त्या घडल्या नसत्या तर जगाच्या व्यवस्था आतासारख्या नसत्या, त्या काही वेगळ्या असल्या असत्या.

या तीन साथींबाबतचे हे रोचक संकलन, रोगांच्या निमित्ताने जगाचा इतिहास सांगणारे आणि बरेच काही शिकवणारे...

१. जस्टिनाईनचा प्लेग (सहावे शतक)

तसा प्लेग दुसऱ्या शतकातही उद्भवला होता, पण त्याचे महाभयंकर स्वरूप सहाव्या शतकात पाहायला मिळाले. ‘जस्टिनाईनचा प्लेग’ या नावाने ओळखली जाणारी ही महामारीचे वर्ष होते इसवी सन ५४१. बायझान्टाईन साम्राज्य हे त्या काळातील युरोपातील प्रसिद्ध साम्राज्य आणि जस्टिनाईन हे सम्राटाचे नाव.

बायझान्टाईन साम्राज्य हे वैभवशाली रोमन साम्राज्याच्या विभाजनानंतर निर्माण झाले होते. त्यापैकी रोमच्या पूर्व, दक्षिण भागावर असलेले राज्य बायझान्टाईन या नावाने ओळखले जात होते. त्याची राजधानी होती, कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आताचे इस्तंबूल. हे शहर मध्ययुगात युरोपातील सर्वांत श्रीमंत शहर म्हणून ओळखले जात होते.

जस्टिनाईन हा इसवी सन ५२७ ते ५६५ या काळात या साम्राज्याचा सम्राट होता. तो उत्तम प्रशासक म्हणून ओळखला जाई. त्याने अनेक सुधारणा केल्या. त्यापैकी एक म्हणजे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केलेल्या सुधारणा.

इजिप्त ते कॉन्स्टँटिनोपल :

सम्राट जस्टिनाईन याच्याच काळात या साम्राज्यात प्लेग पसरला. तो इजिप्तमार्गे तेथे पोहोचला. या साम्राज्यात नव्यानेच इजिप्तचा प्रदेश जोडला गेला. या प्रदेशातील लोकांनी सम्राटाच्या सन्मानार्थ राजधानीत (कॉन्स्टँटिनोपल) धान्य पाठवले. पण या धान्यासोबत काय जाणार होते, याचा अंदाज कोणालाच आला नाही. धान्यासोबत काळे उंदीरही राजधानीच्या शहरात पोहोचले. या उंदरांसोबत प्लेगच्या जीवाणूचा प्रसार करणाऱ्या पिसवादेखील पोहोचल्या. त्यांनी हा रोग राजधानीच्या शहरात नेला. ते वर्ष होते इसवी सन ५४१.

प्लेग राजधानीच्या शहरात म्हणजे कॉन्स्टँटिनोपलमध्ये धडकला. या रोगाने लगेचच कॉन्स्टँन्टिनोपलला कवेत घेतले. पुढे तो वणव्यासारखा संपूर्ण युरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि अरेबियात पसरला. या महामारीने तब्बल ३ ते ५ कोटी लोकांचा जीव घेतला. काही अभ्यासकांच्या मते, या महामारीमध्ये त्या काळातील जगाची निम्मी लोकसंख्या मृत्युमुखी पडली. (काहींच्या मते पुढील दोन शतकांमध्ये त्याचा उद्भव सुरूच होता आणि बळींचा आकडा जगातील त्या वेळच्या एक चतुर्थांश लोकसंख्येइतका होता.)

रोमन साम्राज्याचे एकीकरण टळले :

सम्राट जस्टिनाईन हा महत्त्वाकांक्षी होता. विभागलेले रोमन साम्राज्य एकत्र करण्याची त्याची योजना होती. मात्र, या महामारीमुळे त्याच्या साम्राज्याला मोठा आर्थिक धक्का बसला आणि त्याचे स्वप्न भंगले. परिणामी, युरोप मध्ययुगात लोटला गेला. या मनुष्य संहारामुळे ख्रिश्चन धर्म वे

Similar questions