पावसाळ्यात तुम्ही आरोग्य ववषयी कोिती काळजी घ्याल?
Answers
Answer:
मुंबई : पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळा सगळ्यांच्या आवडतीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उदभवतात. मान्सून सुरू होताच आरोग्या बाबतीत समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषित पाण्याने आजार पसरतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते, रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा वेळेस आहाराचे योग्य नियोजन असायला हवे.
पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात.
पाहा कसा असावा आहार -
- आषाढ, श्रावण, भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
- मीठ आणि आंबट कमी असलेले जेवण करावे. लोणचे, चटणी, दही, अतितिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये.
- उकडलेल्या भाज्या, पालेभाज्यांचा समावेश आहारात करू नये. फळभाज्यांवर भर द्यावा. उदा. भोपळा, दुधी. आहारात मुगाची डाळ, खिचडी, मका हे पदार्थ आरोग्यास लाभ दायक आहेत