India Languages, asked by patilsanjivani, 1 year ago

पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा​

Answers

Answered by halamadrid
36

Answer:

उन्हाळ्यामुळे त्रासलेले लोक पावसाची वाट पाहत असतात.पाऊस येताच सगळ्यांनाच मजा येते.पावसाळ्यात निसर्गाचे दृश्यच बदलून जाते.

आपल्या आसपासच्या परिसरात पावसामुळे खूप बदल होतो.झाडे,पाने पावसाच्या पाण्यामुळे अधिक हिरवीगार दिसू लागतात.इमारतींवर,घरांवर जमा झालेली धूळ साफ होते.मातीचा मनमोहक सुगंध सर्वत्र पसरतो.पशु पक्षी ही पावसामुळे आनंदित होतात.

पण जेव्हा पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो,तेव्हा लोकांचे खूप हाल होतात.रसत्यांवर पाणी साठते.काही लोकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे त्यांचे फार नुकसान होते.रसत्यावर जमा झालेल्या चिखळामुळे लोकांचे कपडे खराब होतात.अधिक पाऊस पडल्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे विजसुद्धा जाते.तेव्हा पाऊस नकोसा वाटतो.

Explanation:

Answered by mrMEGAMIND
2

Answer:

bunra

Explanation:

thomi khangugue pachito pachito bunri

Similar questions