padakya gharache aatmakathan
Answers
Answer:
मी एक पडके जुने कौलरू घर बोलतोय. वाटल्यास तु मला जुना पडका वाडा ही समजू शकतोस. आज तु खूप हौसेने तुझ्या आजोबांबरोबर मला भेटायला इथे आला आहेस. त्याचा मला खरंच खूप अंत्यानंद झाला आहे. आणि का नाही होणार आनंद मला? आज इतक्या वर्षानंतर मला कोणीतरी भेटायला आले आहे. नाही तर गेली कित्येक वर्षे मी इथे एकटाच ओसाड पडून आहे.
तुझे आजोबा आणि त्यांची भावंडे याच घरात जन्माला आली. इथे भले मोठे एकत्र कुटुंब राहत असे. मोठे कुटुंब म्हंटले की, मी सकाळी सूर्योदयापासून ते अगदी सूर्यास्तापर्यंत गजबजून निघायचो. माझ्या अंगणात अनेक लहान मुले खेळत असायची.
घरातील पुरुष मंडळींचा दरारा आणि मोठा आवाज तर असायचाच परंतु त्याचबरोबर घरातील स्त्रियांच्या गप्पा गोष्टी, कुजबुज, ओव्या, अंगाया या ही अधून मधून मला ऐकायला मिळत होत्या. घरातील तान्ह्या बाळांसाठी स्त्रिया जेव्हा अंगाई गीते गात असीत तेव्हा संपूर्ण कुटुंबासोबत माझेही मन सुखावत असे.
काय सांगू मित्रा तुला? आज जरी तुला मी असा भकास आणि ओसाड दिसत असलो तरी पूर्वी याच अंगणाभोवती अनेक प्रकारची फुलझाडे व फळझाडें लावलेली होती. माझ्या प्रवेशद्वारावर एक छानसे बहरलेले तुळशी वृंदावन होते किबहुना ते आजही आहे पण संपूर्ण सुकून गेले आहे. चिकू, पेरू तर भरपूर येतच होते परंतु रातराणीचा सडाही खूप बहरून येत असे.
दोन झाडांना दोऱ्या लावून तुझे आजोबा आणि त्यांची इतर चुलत भावंडे उंच झोपळा करून झुलताना आजही माझ्या डोळ्यासमोर दिसतात. कोणी शाळेत जायचे तर कोणी शाळेतून आल्यावर दप्तरं तसेच बाजूला फेकून सरळ खेळायला सुरु करायचे. कोणी संपूर्ण अंगण सायकलच्या फेऱ्या मारत मज्जा करायचे. लंगडी धावकी आणि लपाछपीचे डाव रंगायचे. लगोरी आणि विटीदांडू तर संपूर्ण दिवसभर चालत असे.
लाकडाच्या फळीने बॅट बॉल खेळता खेळता धडपडणारी, भांडणे करून एकमेकांवरून रुसून पुन्हा एकत्र दंगा घालणारी सर्व मुले आज वयस्कर झाली आहेत परंतु माझ्या डोळ्यासमोर ती तशीच लहान लहान आहेत.
मित्रा, माझ्यासाठी एक घर म्हणून सर्वात आनंदाचा आणि सुखाचा क्षण कोणता असायचा माहिती आहे का तुला? सण - वार आणि व्रत- वैकल्याचा. ज्या ज्या वेळी गणेशोत्सव, मकरसंक्रांत, गुढीपाडवा, होळी, दिवाळी किंवा दसरा कोणता ही सण येत असे त्या वेळी मी खूप आनंदी असायचो.
कारण सणवाराला घरातील स्रिया मला खूप सजवित असायच्या. दरवाजावर सुंदर तोरण लावले जात. साफसफाई, झाडलोट आवर्जून होत असे. संपूर्ण अंगण छान सारवले जात असे. त्यानंतर सुंदर रांगोळ्या घातल्या जात असायच्या. पूजाअर्चा, आरत्या, होम हवन आणि स्वादिष्ट भोजनाच्या सुवासाने संपूर्ण घर दरवळून निघत असे.
परंतु म्हणतात ना की सुख थोडे दुःख भारी अशी वेळ माझ्यावरही आली. एकत्र कुटुंब पद्धती हळू हळू संपुष्टात येऊ लागली आणि हळू हळू प्रत्येकाने स्वतःचे स्वतंत्र असे घर बांधले. हळू हळू प्रत्येक जण मला सोडून जाऊ लागला. मुले मोठी झाली आणि जागा कमी वाटू लागली. ज्या अंगणात खेळून लहानाचे मोठे झाले, ज्या अंगणामुळे कधी ही क्रिकेटसाठी वेगळ्या क्रिडांगणाची गरज वाटली नाही ते अंगण प्रत्येकाला हळू हळू छोटे भासू लागले. खोल्या कमी पडू लागल्या.
जुनी पिढी ज्या माणसांच्या ओढीने एकमेकांना मायेची उब देत एकत्र सुख दुःख वाटून जीवन जगत होती त्याच या ठिकाणी नव्या पिढीला स्वतःच्या आवडीने, नवीन सोयीसुविधानी बनलेले असे स्वतःचे घर बांधून हवे वाटू लागले. आणि एक एक करून प्रत्येकाने आपली स्वतंत्र घरे बांधली.
Explanation:
I HOPE MY ANSWER IS USE FULL