India Languages, asked by snehalatarathod84, 10 months ago

पहिला पाऊस या विषयावर दहा-बारा ओळी लिहा

please answer

and those who know answer only them please answer right ​

Answers

Answered by shraddha2035
2

Explanation:

पहिला पाऊस !!!

पहिला पाऊस... पहिला पाऊस म्हटलं की त्या पावसासोबत येणारा वारा , आकाशात येणारे ते काळे ढग , पक्ष्यांची घरट्यात जाण्यासाठी असणरी लगबग असं सगळं प्रसन्न वातावरण असतं. पहिल्या पावसाचा थेंब जेव्हा उन्हाने तापलेल्या जमिनीवर पडतो , तेंव्हा येणारा मृद्गंध तर काय वर्णावा! हातातील सगळी कामं टाकून त्या पावसात मनमुराद भिजायचं. पावसाचे ते टपोरे थेंब अंगाला टोचत असले तर ते झेलून त्यांचा आनंद घ्यायचा. मातीचा सुगंध दरवळत असतांना

मित्रांबरोबर नाचायचं. आपल्यातील प्रत्येकाला पहिला पाऊस कधी ना कधी अणुभवायला मिळतोचं. काहीजण हा पाऊस फक्त घराच्या खिडकीतून अणुभवतात , तर काही लांब डोंगरावर जाऊन. पहिल्या पावसात सोबत चहा आणि गरमागरम भजी असलीतरी त्या पावसाची गंमत ही वेगळीच असते. एकंदरीत काय तर , प्रत्यकाची पहिला पाऊस अणुभवायची वेगळी तह असते.

Hope it's helpful !!!!!

plzzzzz mark as brainlist and follow me!!!!!!

Answered by ItsShree44
0

Answer:

पाऊस किती लहरी ! जूनची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता, एवढेच काय ! पावसाची दूरवर देखील कुठे चिन्हेही दिसत नव्हती, उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते? जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते. पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाची आराधना करत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकड डोळे लावून बसला होता.

एके दिवशी अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. 'आला, आला, पाऊस आला !' असे म्हणत ते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. टपोरे थेंब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हाराच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे, म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. तीन तासांनंतर पाऊस ओसरला. अचानक आला तसा अचानक थांबला. केवढा किमयागार हा पहिला पाऊस ! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टवटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! असा हा किमयागार पहिला पाऊस !!

Similar questions