पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक
कचेरोला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती; परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन
मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कैंटीनच्या आचाऱ्याने तर माझ्या 'डायट' वर सूड
घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार! बिचारा सहा वर्षांनी एफिशिएन्सी
बार च्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचाऱ्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती.
घासाघासागणिक सहसावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या, त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटेवडे होते.
म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल 'वनस्पती'तला, त्यामुळे आणखी कॅलरीज आणि एवढे सगळे हादडून शेवटी
'भज्यांशिवाय पार्टी कसली?' या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर
दिली.
शेवटी मला राहवेना. भज्यांची सहावी प्लेट उडवल्यावर, मी अत्यंत केविलवाण्या स्वरात 'सध्या मी 'डाएट'वर
असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले.
"अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध?" भिकोबा मुसळे म्हणाला, “मी बघ एकवीस गुलाबजाम
खाल्ले-एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाईज नाही केला. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण
करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहाणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे?"
"नॉन्सेन्स!" जगदाळे ओरडला, "रनिंग कर रोज. बहिन I want people name of people all over the paragraph
Attachments:
Answers
Answered by
1
Explanation:
prashan nit type kar bhava to samjat nahi aahe
Similar questions